Shivaji Maharaj Jayanti: जिजाऊसारखी आई होती म्हणून घडले शिवबा, कसे असावे आई-मुलाचे नाते

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येते. १६३० मध्ये शिवनेरीच्या डोंगरी किल्ल्यावर शिवाजी बाळराजे जन्माले आले. मात्र तत्पूर्वी जिजाऊचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर तुळजाभवानीला साकडे घालून देशाला, धर्माला, कुळाला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे असे जिजाऊने सांगितले आणि मग झाला शिवबाचा जन्म. शिवाजी राजांच्या आद्यगुरू म्हणजेच त्यांच्या माता जिजाबाई. आपल्या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार करत हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवणारी ही धडाडीची आई होती. शिवरायांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या कसे होते त्यांच्या आईसह नाते. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​गरोदर असतानाच रोवली होती मुहूर्तमेढ

​गरोदर असतानाच रोवली होती मुहूर्तमेढ

शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळीच जिजाऊने घोड्यावर स्वार होते शिवनेरीच्या दिशेने कूच केले होते. एका अर्थाने स्वराज्याची मुहूर्तमेढच रोवली होती असं म्हणावं लागेल. शिवाई देवीचा आशिर्वाद म्हणून या बाळाचा नाव शिवाजी ठेवण्यात आले. मायेच्या नजरेसह योग्य सल्ला आणि मार्गदर्शन म्हणूनच शिवराय घडले. सगळ्या बाजून सुलतानी आणि मुघल राजवट असताना शिवनेरीवर मात्र हिंदवी स्वराज्याचे धडे शिवरायांना या माऊलीने दिले.

हेही वाचा :  Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: शिवाजी महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कधी आणि कशी मिळाली?

गुरू शिष्याचेही नाते

गुरू शिष्याचेही नाते

आई हाच पहिला गुरू असं म्हणतात हे शिवाजी आणि जिजाऊच्या बाबतीत तंतोतंत खरे होते. आईचे संस्कार देण्यासह त्यांनी चांगले विचार, शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन केल्याने शिवाजी राजे घडू शकले. जिजाबाईंनी पाहिलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवाजीराजांनी पूर्ण केले. मुलाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याची जगण्याची योग्य दिशा ठरवणारी आई विरळाच. आई आणि मुलांमध्ये इतके सुंदर नाते असल्यानंतर अजून काय हवे. स्वतःच्या छत्रछायेखाली शिवाजी राजांना जिजाऊंनी घडवलं.

(वाचा – सुखी वैवाहिक जीवनासाठी शिवशंकर आणि माता पार्वतीकडून घ्या असा आदर्श, टिकेल नाते जन्मभर)

​आई आणि जवळचा मित्र​

​आई आणि जवळचा मित्र​

पालकांनी आपल्या मुलांना मित्राप्रमाणे वागणूक द्यावी मात्र त्याचसह आई-वडील म्हणून योग्य आदरही राखला गेला पाहिजे आणि हाच धडा जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या बाबतीतही गिरवला होता. शिवरायांच्या मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानही त्यांची आई होती. सतत अडचणींचा सामना करत आपली मूल्य शिवबांनी त्यांनी दिली. महाराजांवर योग्य संस्कार करत असताना योग्य न्यायनिवाडा कसा झाला पाहिजे, कठोर शासन करताना निरपराधी आणि अपराधी व्यक्तींना कसे ओळखावे या सगळ्याचीही शिकवण दिली.

(वाचा – धर्माच्या भिंती ओलांडून अखेर अभिनेत्री स्वरा भास्करने बांधली फहाद झिरार अहमदशी लग्नगाठ)

हेही वाचा :  लघवीत जळजळ, फेस, फिकट रंग व ही 8 लक्षणं देतात किडनी सडल्याचे संकेत, लगेच हे 4 उपाय करा

​रामायण – महाभारतातील धडे देत शिकवली राजनीती ​

​रामायण - महाभारतातील धडे देत शिकवली राजनीती ​

राष्ट्र, धर्म आणि योग्य-अयोग्याची जाण करून देण्यासाठी रामायण आणि महाभारतातील गोष्टींचे उदाहरण शिवरायांना जिजाऊ ऐकवत असत. वयाच्या १४ व्या वर्षापासूनच शिवरायांनी राजराकरणाचा आणि रयतेचा भार उचलला. यावरूनच त्यांना बालपणापासूनच देण्यात आलेले संस्कार हे किती मनावर ठासलेले असतील याचा अंदाज येऊ शकतो.

(वाचा – धर्म आणि वयाची बंधनं झुगारून केले होते मराठमोळ्या उर्मिलाने लग्न, करतेय सुखाचा संसार)

​आईचे स्वप्न शिवबांनी केले पूर्ण​

​आईचे स्वप्न शिवबांनी केले पूर्ण​

हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून शिवरायांनी जनतेला सोडविले. आईचे स्वप्न पूर्ण करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. इतकंच नाही तर जिजाऊंनी शेवटपर्यंत आपल्या लेकाला साथ दिली. आईच्या इच्छेनुसार अनेक गड – किल्ले सर करत शिवरायांनी हे स्वप्न पूर्ण केलेच. जिजाऊंच्या शिकवणीप्रमाणेच शिवाजीराजे रयतेचा राजा म्हणून नावाजले गेले. आई आणि वडिलांचे दोघांचेही संस्कार जिजाऊंनीच केले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर सुखसमाधानाने १२ व्या दिवशी जिजाऊ माऊलीचे निधन झाले.

आई आणि मुलाचे असे प्रेम फारच क्वचित आता पाहायला मिळते. आईचे योग्य संस्कार, मार्गदर्शन आणि मुलाने आईचे ऐकून सर्व जबाबदारी समजून वागणेच आयुष्याला योग्य दिशा देऊ शकते हाच आदर्श जिजाऊ-शिवाजी राजांच्या आदर्श जोडीने घालून दिला आहे.

हेही वाचा :  पडद्यावरून गायब असणाऱ्या हिना खानने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने जिंकली चाहत्यांची मने, इंटरनेटचा पारा सर्रकन वाढला

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …