Maharashtra Corona Update : महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी बातमी; साताऱ्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : देशात कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक झाला आहे. तर, महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची वाढता आकडेवारी धडकी भरवणारी आहे (Maharashtra Corona Update). सातारा (Satara)  जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. त्यातच उपचारा दरम्यान साताऱ्यात दोघांचा मृत्यू (death due to covid) झाला आहे. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील सहा दिवसांत तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

दोघा रुग्णांच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाला आहेत. गर्दीची ठिकाणे जाणे टाळावे. मास्कचा वापर करणे तसेच काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
पुण्यात महिलेचा मृत्यू

पुण्यातही कोरोनाचा  वेगाने फैलाव होत आहे. पुणे मनपा हद्दीत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 75 ते 80 या वयोगटातही ही महिला रूग्ण होती. 24 तासांत पुणे जिल्ह्यात ९३ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर, पुणे शहरात 39 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. पुणे मनपा आरोग्य यंत्रणा या रूग्णवाढीमुळे सतर्क झाली आहे.   सोलापुरात एकाच दिवसात दहा कोरोना रुग्ण आढळले आहेत.  सध्या सोलापूर शहरात 69 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा :  Maharashtra Rain : आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट

महाराष्ट्रात कोरोनामुळे एकू तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 562 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 395 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून योग्य दक्षता घेतली जात आहे. 

देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ

पुन्हा एकदा देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. देशात एकाच दिवसात 3 हजार 641 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोरोना रुग्ण वेगानं वाढ होत आहे. सध्या देशात 20219 सक्रिय रुग्ण आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …