एकेकाळी श्रीलंका आणि इंडोनेशियामधून लुटलेला खजिना नेदरलँड्स परत करणार !

Netherlands News : विश्वातून एक मोठी बातमी. नेदरलँड इंडोनेशिया आणि श्रीलंकेला त्यांचा खजिना परत करणार आहे. शेकडो सांस्कृतिक कलाकृती आणि दागिने, मौल्यवान धातू आणि हिरे, मोती, सोने जडीत एक तोफ, नेदरलँड्स लवकरच श्रीलंका आणि इंडोनेशियाला परत येणार आहेत. या दोन देशात एकेकाळी डच वसाहती होत्या आणि या सर्व मौल्यवान वस्तू या दोन देशांकडून लुटल्या गेल्या होत्या. गुरुवारी, हेगमधील सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले की यातील बहुतेक कलाकृती सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि अत्यंत मौल्यवान आहेत.

डच राज्याचे संस्कृती आणि माध्यम सचिव गुने उसलू म्हणाले, ‘हा एक ऐतिहासिक घटना आहे. नेदरलँड्समध्ये कधीही आणलेल्या वस्तू परत करण्यासाठी आम्ही समितीच्या शिफारसींचे पालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण आम्ही फक्त वस्तू परत करत नाही. आम्ही खरोखर एक नवे युग सुरु करत आहोत. ज्यामध्ये आम्ही इंडोनेशिया आणि श्रीलंका यांच्याशी अधिक चांगले प्रस्तापित करु शकणार आहेत. जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ ठिकाणी Gold mines

478 वस्तू परत करण्याचा निर्णय

नेदरलँड्स सरकारने गेल्यावर्षी नेमलेल्या आयोगाच्या शिफारशींचा विचार करुन सुमारे 478 वस्तू परत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या शिफारसीनुसार बेकायदेशीर डच वसाहतीमधून आणलेल्या अनेक मौल्यवान वस्तू नेदरलँड्समधील संग्रहालयात ठेवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :  भारत- श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज; कधी, कुठे आणि कसा पाहायचा?

सांस्कृतिक मंत्री उसलू म्हणाले की त्यांनी 2020 मध्ये डच समितीने प्रकाशित केलेल्या अहवालात दिलेल्या शिफारशींवर कारवाई केली. ही समिती वसाहतीच्या काळात लुटलेल्या वस्तूंची चौकशी करत होती.  समितीने या वस्तू परत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

डच वसाहतीमधून आणण्यात आलेल्या वस्तू त्या देशांना परत मिळणार आहे. वास्तवादी भूतकाळाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे. नेदरलँड्सने या अन्यायाचे निवारण केले. इंडोनेशियाला त्याच्या पूर्वीच्या वसाहतवादी शासकाकडून नैसर्गिक इतिहास संग्रह आणि कलाकृती परत करण्याच्या विनंतीवर आधारित आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

कोणत्या मौल्यवान वस्तू परत करणार?

काही मौल्यवान वस्तूंमध्ये 1894 मध्ये इंडोनेशियन लोम्बोक बेटावरgन डच वसाहतवादी सैन्याने लुटलेले ‘लोम्बोक ट्रेझर’, शेकडो मौल्यवान दगड, चांदीच्या वस्तू आणि सोने यांचा समावेश आहे. नेदरलँड सरकारने या खजिन्याचा काही भाग 1977 मध्ये इंडोनेशियाला परत केला.

लुटलेल्या कलाकृतींपैकी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कँडी तोफ. जी श्रीलंकेलाही परत केली जाईल. हे प्रतिकात्मक शस्त्र चांदी, सोने, कांस्य, माणिक यांनी बनलेले आहे. कँडीच्या राजाच्या प्रतिकांनी सजवलेले बॅरल 1765 मध्ये डच लोकांनी लुटले होते, असे सांगितले जात आहे. हा तुकडा 1800 पासून ‘रिज्क्सम्यूजियम’च्या वस्तू संग्रहाचा भाग आहे. दरम्यान, या आठवड्यात, इंडोनेशियामधून लुटलेल्या कलाकृती अधिकृतपणे परत करण्यासाठी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :  धोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण 'या' हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …