कोण आहे वैभव अरोरा? त्याच्यासमोर चेन्नईच्या फलंदाजांनी टेकले गुडघे

Who is Vaibhav Arora: मुंबईच्या ब्रेबोर्न स्डेडियमवर पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला 54 धावांनी पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. परंतु, पंजाबकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज वैभव अरोरानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं सीएसकेविरुद्ध सामन्याच्या सुरुवातीला सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि मोईन अलीसारख्या धोकादायक फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर चेन्नईच्या एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. ज्यामुळं चेन्नईच्या संघाला या हंगामातील सलग तिसऱ्या पराभवावा सामोरे जावा लागलं होतं.

दरम्यान, पंजाबनं वैभव अरोराला चेन्नईविरुद्ध मैदानात उतरवले तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. संघ व्यवस्थापनानं  संदीप शर्मासारख्या खेळाडूऐवजी त्याला संघात संघात सामील करून घेतलं. संदीप हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच तो त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठीही ओळखला जातो.

2019 मध्ये सौराष्ट्रविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण
देशांतर्गत क्रिकेटमध्ये वैभव अरोरा हिमाचल प्रदेशकडून खेळतो. त्यानं 2019 मध्ये सौराष्ट्रविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याशिवाय त्यानं 2021 मध्ये छत्तीसगडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

हेही वाचा :  भारत श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, सामन्यासबंधी A टू Z माहिती एका क्लिकवर

वैभव अरोराची कामगिरी
वैभवनं आतापर्यंत 13 टी-20 सामने खेळले होते. या सामन्यात त्यानं 23 च्या सरासरीनं 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.82 होता. आयपीएलच्या मागच्या हंगामात तो केकेआरच्या संघाचा भाग होता. परंतु, त्याला कोलकात्याकडून पदार्ण करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर आयपीएल 2020 मध्ये पंजाबच्या संघानं त्याला नेट बॉलर म्हणून संघात सामील करून घेतलं होतं. 

वैभवच्या कामगिरीचं धवनकडून कौतूक
वैभवबद्दल बोलताना धवन म्हणाला की, वैभव अरोरानं चेन्नईविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. नेटमध्ये आरोरा चांगली गोलंदाजी करत आहे. त्याच्या गोलंदाजीवर खेळण्यास थोडी अडचण जाणवते.  तो चांगल्या लाईन आणि लेन्थ गोलंदाजी करतो, असंही त्यानं म्हटलंय. 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …