Karnataka Election : बजरंग दलाचा मुद्दा पेटला, आता काँग्रेसची भगवान हनुमानाबाबत मोठी घोषणा

Karnataka Election 2023 : काँग्रेसने बजरंग दल संघटनेवर बंदी केल्याची घोषणा केली आणि भाजपने हाच मुद्दा प्रचाराचा प्रमुख भाग बनवला. भगवान हनुमान कर्नाटक राज्यातील निवडणूक मुद्द्यांच्या केंद्रस्थानी आले आहेत. दरम्यान, काँग्रेसनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी नवी भूमिका घेतली आहे. राज्यभरात हनुमान मंदिरे बांधण्याचे आणि मंदिरांचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन लोकांना दिले आहे.

काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालणे म्हणजे हनुमानावर बंदी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी म्हटले. त्यांनी ‘जय बजरंगबली’ अशी घोषणा दिली. त्यानंतर भाजपने हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला आहे.  माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा फाडला आणि जोडे मारो आंदोलन केले. तसेच राज्याच्या अनेक भागात मोर्चे काढले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काँग्रेसकडून जोरदार बचाव

उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी राज्यभरात हनुमान चालिसाचे पठण करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आता या मुद्द्यावर बचावाची भूमिका घेतली आहे. 10 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुका ज्या मुद्द्यांवरुन काँग्रेसला लढवायची होती, ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने आता मागे पडल्याचे दिसत आहे. म्हैसूरमधील चामुंडी टेकडीवर चामुंडेश्वरी, म्हैसूरची देवी, तसेच अंजनेय यांची पूजा केल्यानंतर, शिवकुमार यांनी राज्यभरात अधिक हनुमान मंदिरे बांधण्याचे किंवा विद्यमान मंदिरांचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. 

हेही वाचा :  शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना मिळणार 2 लाख रुपये; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं आश्वासन

रामनगरातील कनकपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे शिवकुमार म्हणाले, रामाचा भक्त हनुमान. या हनुमानजीची मंदिरे सर्वत्र आहेत. आम्ही आंजनेय (हनुमान) मंदिरे बांधली  आहेत आणि आम्ही त्यांचे भक्तही आहोत. विशेषत: आम्हा कन्नड लोकांचा त्यांच्यावर गाढ विश्वास आहे, जिथे हनुमानाचा जन्म (या) राज्यात झाला होता, याचे भक्कम पुरावे आहेत, असे डीके शिवकुमार म्हणाले. अंजनेय मंदिरे आणि भगवान हनुमान यांच्या आदर्शांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. 

शिवकुमार म्हणाले, राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये हनुमानाच्या नावाने धोरण आणि कार्यक्रम करणार असून, त्यातून तरुणांना हनुमानाचा आदर्श स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल. चामुंडेश्वरी देवीची शपथ घेत त्यांनी काँग्रेस अंजनाद्री विकास मंडळ स्थापन करणार असल्याचे सांगितले. देवाच्या नावावर राजकारण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधत त्यांनी भाजपने किती अंजनेय मंदिरे बांधली, असा सवाल केला.

पंतप्रधान मोदींसह भाजपचे लोक राजकीय फायद्यासाठी देवाच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिवकुमार यांनी केला आहे. भाजप लोकांच्या भावनांशी खेळत आहेत.  बेंगळुरु आणि म्हैसूर दरम्यान किमान 25 अंजनेय मंदिरे आहेत, जी राज्याचे पहिले मुख्यमंत्री केंगल हनुमंतय्या यांनी बांधली होती, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. भाजपने एकही मंदिर बांधले का? त्याचे भांडवल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, ज्याकडे कोणीही लक्ष देणार नाही. ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे होणार नाही. काँग्रेस सत्तेवर येईल. आम्ही राम आणि अंजनेयशी संबंधित सर्व मंदिरे बांधू, असे काँग्रेसकडून आश्वासन देण्यात आलेय.

हेही वाचा :  "सुपाऱ्या घेऊन आम्हाला..."; संजय राठोडांसदर्भात प्रश्न विचारताच भडकल्या चित्रा वाघ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …