काही मिनिटांत तुमच अकाऊंट होतं हॅक किंवा बँकेतील बॅलेन्स होतो शून्य, फिशिंग म्हणजे नेमकं काय? कशी घ्याल काळजी

How to prevetn phishing : आजकाल सायबर गुन्ह्यांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. आजकाल सर्वत्र ऑनलाईन घोटाळे होताना दिसून येतात. अनेकदा ईमेलद्वारे हे घोटाळे केले जातात. तर कधी फोन, सोशल मीडिया अकाऊंट यावरुनही गंडा घातला जातो. या सर्व हल्ल्यांनाच फिशिंग असं म्हणतात. ईमेलवरुन फिशिंग होते. तसंच फोनवरुन होणारे घोटाळे हे ‘विशिंग’ म्हणून तर सोशल मीडियावरील स्कॅमना ‘स्मिशिंग’ म्हणतात.

फिशिंग करताना फिशिंग ज्या व्यक्तीची करणार असतात त्याला चूकीची माहिती पुरवली जाते. तसंच अनेकदा ओळखीच्या व्यक्तीकडून ईमेल किंवा सोशल मीडियावर मेसेज येतो. आपणही व्यक्ती ओळखीची असल्याने सर्व काही शेअर करतो. त्यानंतर आपली सर्व इन्फो त्याच्याकडे पोहचली जाते. उदाहरणार्थ जसं की तुमच्या बॉसकडून तुम्हाला ईमेल आलेला असतो, त्यामुळे तुम्ही जे विचारले जाते ते कोणताही विचार न करता उत्तर देऊन टाकता. ज्यामुळे तुमची सर्व माहिती समोरच्याला मिळून जाते. तर फिशिंगबद्दलची वेगवेगळी माहिती, त्याचे प्रकार आणि त्यापासून कशी काळजी घ्याल जाणून घेऊ…

​फिशिंग हा शब्द कुठून आला?

​फिशिंग हा शब्द कुठून आला?

तर मूळात ही जी सर्व फसवणूक होते तिला इंग्रजीत Phishing असं म्हटलं जातं. हा शब्द मूळ शब्द Fishing मधूनच आला आहे. मासे पकडताना योग्य गळाला लावून माशाची शिकार केली जाते आणि याच मासेमारीला इंग्रंजीत फिशिंग (Fishing) म्हणतात. त्याचप्रकारे सायबर गुन्हे करणारे व्यक्ती तसंच कंपन्यांची अशाचप्रकारे शिकार करतात ज्यालाही फिशिंग (Phishing) म्हणतात.

हेही वाचा :  Ukraine-Russia War: युक्रेनवर रशियाचा सायबर हल्ला, अनेक सरकारी वेबसाईट्सवर साधला निशाणा

​​वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स

​फिशिंग हल्ले कधी सुरू झाले?

​फिशिंग हल्ले कधी सुरू झाले?

समोर येणाऱ्या माहितीनुसार १९९० च्या दशकाच्या मध्यात AOHell सारख्या सॉफ्टवेअर टूल्सच्या वापराने फिशिंग करण्यास सुरुवात झाली. वापरकर्त्यांची नावं आणि पासवर्ड चोरण्याचा प्रयत्न केला यावेळी केला जाऊ लागला. हे सुरुवातीचे हल्ले यशस्वी झाले कारण हा एक नवीन प्रकारचा हल्ला होता, जो आधी वापरकर्त्यांनी पाहिला नव्हता. यानंतर याबद्दल बरीच जागरुकता झाली होतही आहे, पण तरीही 20 वर्षांहून अधिक काळापासून ही फिशिंग सुरुच आहे.

​वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!

​कसा होतो फिशिंग अटॅक?

​कसा होतो फिशिंग अटॅक?

हे घोटाळे कोणालाही, कधीही लक्ष्य करू शकतात. फिशिंग घोटाळ्यांचे उद्दिष्ट कधीही बदलू शकते. पण अनेकदा फिशिंगमागील उद्देश हा अकाऊंटमधील पैसे लुटणे हाच असतो. फिशिंग करताना अधिकवेळेला फिशिंग करणारे समोरच्याला त्याची खाजगी माहिती प्रविष्ट करण्यास प्रवृत्त करतात. यासाठी फेक वेब पेज करुन तुम्ही मोठं बक्षीस जिंकलं आहात असं वैगेरे सांगून विशेष ऑफर मिळवण्याची संधी असल्याचं सांगून सर्व माहिती काढली जाते. ज्यानंतर ही माहिती वापरुन बँक खाती आणि इतर अकाऊंट्स हॅक केली जातात.

हेही वाचा :  Cryptic Pregnancy : गुप्त गर्भधारणा म्हणजे काय? याचा बाळावर काय परिणाम होतो?

​वाचा: iPhone 14 Price : लेटेस्ट यलो आयफोन 14 घ्यायचाय? मिळतेय १२ हजारांची तगडी सूट

​​फिशिंग हल्ल्यांमुळे किती होता तोटा?

​​फिशिंग हल्ल्यांमुळे किती होता तोटा?

फिशिंग घोटाळ्यांमधून होणार्‍या फसवणुकीची एकूण किंमत मोजणे तसे कठीण आहे, कारण एका व्यक्तीला किंवा कंपनीलाही गंडा घातलो जातो. हा गंडा अगदी काही डॉलर्सपासून ते लाखो डॉलर्सची घरात असतो. मोठ्या कंपन्यामध्ये यशस्वी फिशिंग हल्ल्यांमुळे कोट्यवधीचे नुकसानही होऊ शकते. एका रिसर्च पेपरमध्ये असे समोल आले आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये वर्षाला जवळपास १५ मिलीयन डॉलर्सपर्यंत फिशिंग होत असते.

​वाचाः Nothing Phone 1 एक जबरदस्त डील, मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदीची संधी

​फिशिंग हल्ला होतोय कसं ओळखाल?

​फिशिंग हल्ला होतोय कसं ओळखाल?

फिशिंग हल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या लेटेस्ट टेक्नोलॉजी वापरल्या जातात. पण वाढत्या सिक्युरिटी आणि जागरुकतेमुळे अनेकांना कोणत्याही संशयास्पद गोष्टी झाल्यास लगेचच याबद्दलची माहिती होऊ लागते. पण तरी दुसरीकडे असे अने लोक आहेत जे पहिल्यांदाच इंटरनेटवर प्रवेश करत आहेत. त्यांना फिशिंगच्या संभाव्य धोक्याबद्दल जागरूकता देखील नाही. अशा व्यक्तींना हल्लेखोर आपले लक्ष्य करतात. पण बऱ्याचदा फिशिंग करणाऱ्यांची टेक्निक सेम असते. एखादी लॉटरी किंवा बक्षीस मिळालं आहे अशा प्रकारच्या अगदी अवाक करणारे मेसेज ते पाठवून तुमची इन्फो काढू बघतात. त्यामुळे असे काही झाल्यास तुम्ही लगेचच सावध होऊ शकता.

हेही वाचा :  घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा

​फिशिंगपासून कसा कराल बचाव?

​फिशिंगपासून कसा कराल बचाव?

फिशिंगपासून बचावाकरता कायम सतर्क राहिलं पाहिजे. जसंकी कोणत्याही अनोळखी इमेल, फोननंबरशी कॉन्टॅक्ट करताना सावधानता बाळगली पाहिजे. अनेकदा आधुनिक फोन्स आणि लॅपटॉप्समध्ये अनोळखी आणि संशयास्पद मेल किंवा नंबरवरुन कॉन्टॅक्ट झाल्यास स्पॅम किंवा फ्रॉड अशाप्रकारे सूचला दिली जाते. त्याला गंभीररित्या घेऊन संबधित मेल किंवा नंबरला रिपोर्ट आणि ब्लॉक केलं पाहिजे. तसंच सर्व खात्यांचे मग सोशल मीडिया अकाऊंट किंवा बँक अकाऊंट या सर्वांचे पासवर्ड अगदी स्ट्राँग ठेवून ते वेळोवेळी बदलले देखील पाहिजेत.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …