Breaking News

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू होत्या. 1954 रोजी कुस्तीच्या सामन्यात केवळ 1 मिनिट 34 सेकंदात विजय मिळवून हमीदा बानो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. हमीदा बानो याांनी प्रसिद्ध पैलवान बाबा पहेलवानचा पराभव केला. पराभवानंतर बाबा पहेलवान यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली.

कुस्ती हा खेळ भारतात नेहमीच प्रसिद्ध राहिला आहे. आज भारताला ऑलिम्पिकपासून जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत कुस्तीत पदके मिळाली आहेत. तसेच आमीर खानच्या ‘दंगल’ या सिनेमातून महिला कुस्तीपट्टू यांची जगभरत चर्चा झाली. पण पूर्वी हा फक्त पुरुषांचा खेळ मानला जात होता. महिला कुस्ती करत नसे. स्त्रिया कुस्ती करू शकतात याचा विचारही कोणी केला नाही. त्यावेळी यूपीच्या हमीदा बानोने कुस्तीमध्ये आपले नाव कोरले होते. तिला भारतातील पहिली महिला कुस्तीपटू देखील मानले जाते. कुस्तीच्या लढतीत त्याच्यापुढे एक माणूसही उभा राहू शकला नाही.

लग्न करण्यासाठी अनोखी अट

हमीदा बानो यांनी 1940 आणि 1950 च्या दशकात पुरुषांना आव्हान दिले होते आणि सांगितले होते की, जो कोणी तिला दंगलमध्ये पराभूत करू शकेल त्याच्याशी ती लग्न करेल. हमीदा यांना खरी ओळख मिळवून देणारा पहिला कुस्ती सामना 1937 मध्ये लाहोरच्या फिरोज खानशी झाला. त्या सामन्यात हमीदा यांनी फिरोजचा पराभव केला. यानंतर हमीदा खूप प्रसिद्ध झाल्या, हे खानसाठी आश्चर्यकारक होते. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील खरग सिंग या शीख आणि आणखी एका कुस्तीपटूचा पराभव केला. या दोघांना हमीदा यांच्यासोबत लग्न करण्याचे आव्हान दिले होते.

हेही वाचा :  चैन की नींद सोना है तो..... पाहा या मंत्रात आहे तुम्हाला गाढ झोपवण्याची ताकद

हमीदा यांचा जबरदस्त खुराक 

यूपीच्या मिर्झापूरमध्ये जन्मलेल्या हमीदा बानो यांचा डाएट ऐकूनही अनेकांना घाम फुटायचा. रिपोर्ट्सनुसार, हमीदा बानो यांची उंची 5 फूट 3 इंच होती आणि त्यांचे वजन 107 किलो होते. असे म्हटले जाते की, त्या दररोज 6 लिटर दूध, 1.25 किलो सूप आणि 2.25 लिटर फळांचा रस प्यायचा. यासोबत त्यांना एक अख्खी कोंबडी, एक किलो मटण, 450 ग्रॅम बटर, 6 अंडी, सुमारे एक किलो बदाम, 2 मोठ्या चपात्या आणि 2 प्लेट बिर्याणी खायच्या. दिवसाच्या 24 तासांपैकी 9 तास झोपायच्या आणि 6 तास व्यायाम करायची आणि उर्वरित वेळात फक्त जेवायच्या. 

लोकांचे गैरसमज दूर केले

डमी पैलवानाच्या विरोधात जाऊन हमीदा जिंकतील असा त्याकाळी लोकांचा विश्वास होता. मात्र लवकरच लोकांचा संभ्रम दूर झाला. हमीदा यांनी 1954 मध्ये रशियाच्या वीरा चेस्टेलिनला एका मिनिटापेक्षा कमी अंतराने पराभूत करून सर्वांना थक्क केले. छोटे गामा नावाच्या प्रसिद्ध कुस्तीपटूने शेवटच्या क्षणी हमीदा यांच्याशी लढण्यास नकार दिला होता. वीराला पराभूत केल्यानंतर हमीदाने युरोपला जाऊन लढण्याचा निर्णय घेतला. इथून त्यांच्या करिअरचा आलेख खाली घसरू लागला.

प्रशिक्षकाचे तोडले  हात-पाय

हमीदा बानोचे ट्रेनर सलाम पहेलवान यांना तिने युरोपला जावे असे वाटत नव्हते. रागाच्या भरात सलाम याने काठीने मारून हमीदाचे हातपाय तोडले. यानंतर ती कुस्तीतून गायब झाली. पुढे ती दूध विकून घर चालवत असे. अशा या हमिदा बानो यांच्यासाठी आज गुगलने बनवलं ‘डुडल’

हेही वाचा :  VIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बापरे! हवेतल्या हवेत विमानाला गचके बसले आणि… हेवी टर्ब्युलन्समुळं प्रवाशांचा थरकाप; कोणी रडलं, कोणी किंचाळू लागलं

Indigo Flight Heavy Air Turbulence left passangers terrified : विमान प्रवासाला निघालं असताना या प्रवासाची …

Maharashtra Weather News : वीकेंडला मान्सूनचा मारा! विदर्भात ऑरेंज अलर्ट; कोकणातही मुसळधार, सर्रास आखा सहलींचे बेत

Maharashtra Weather News : राज्यापासून काहीसा दुरावलेला मान्सून आता परतला असून, या मान्सूननं आता राज्यासह …