झुंझुनूमध्ये आहे भारताला मालामाल बनवणारी खाण; थेट भुयारी रेल्वेतून…

Jhunjhunu Copper Mines, झुंझुनू : भारतातील सर्वात मोठी तांब्याची खाण राजस्थानमधील(Rajasthan) झुंझुनू जिल्ह्यात आहे. इथे जिकडे खोदावे तेथे मोठ्या प्रमाणात तांबा धातू सापडते. झुंझुन भारतातील ही सर्वात मोठी तांब्याची खाण(jhunjhunu copper mines) असून या खाणीने भारताला समृद्ध बनवले आहे. या खाणीच्या माध्यमातून फक्त भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी कच्चा माल पुरवला जातो. ही खाण उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत बनली आहे. यामुळे भारत मालामाल झाला आहे. विशेष म्हणजे खोल जमीनीत भुयार खोदून थेट खाणीतूनच रेल्वे मार्ग काढण्यात आला आहे. यामुळे थेट खाणीतूनच रेल्वेद्वारे कच्चा धातूचा पुरवठा केला जातो.

राजस्थानमधील या तांब्याच्या खाणी ‘खेत्री खाणी’ म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.  खेत्रीपासून 10 किमी अंतरावर असलेले खेत्रीनगर हे ‘तांबा प्रकल्प’ म्हणून ओळखले जाते. खेत्री नगर हे भारतातील राजस्थान राज्यातील झुंझुनू जिल्ह्यातील एक शहर आहे. खेत्रीनगर हे ‘कॉपर’ या नावानेही चांगलेच प्रसिद्ध आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने खेत्री नगर खऱ्या अर्थाने विकसीत केले. सध्या येथे जमिनीच्या जवळपास 370 मीटर खोलपर्यंत खाणकाम केले जाते.  येथे भूमिगत रेल्वे सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेच्या मदतीने खाणीतील तांबा धातूचा कच्चा माल वेगवेगळ्या ठिकाणी रिफायनरीजमध्ये पाठवला जाते.

हेही वाचा :  High Blood Pressure चे नुकसान, जीवघेणी ठरु शकते एक चूक

खेत्री खाणींचा इतिहास

1975 पूर्वी भारत रशिया, चीन आणि इतर देशांतून तांबे आयात करत होता. यानंतर खेत्रीनगरमध्ये तांबे स्मेल्टर प्लांट विकसीत करण्यात आला. येथे दर महिन्याला सरासरी साडेतीन हजार टन शुद्ध तांबे तयार होत असते. 23 नोव्हेंबर 2008 पर्यंत हे चक्र  सुरु होते. भारत तांब्याच्या बाबतीत स्वावलंबी होऊ लागला. 1960 मध्ये खेत्री नगरमध्ये तांब्याचा शोध लागला. यावेळेस या खाणी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाच्या अंतर्गत होत्या. 

हिंदुस्थान कॉपर लिमिटेडने तांब्याचे उत्पादन सुरु केले

तांब्याचे उत्पादन करण्यासाठी येथे हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) कंपनीची स्थापना करण्यात आली.  9 नोव्हेंबर 1967 रोजी येथील सर्व खाणी HCL ताब्यात आल्या. येथे खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स (KCC) युनीट स्थापन करण्यात आले. 5 फेब्रुवारी 1975 पासून येथे तांब्याचे उत्पादन सुरू झाले. 

या खाणींमध्ये दरमहा सुमारे साडेतीन हजार टन शुद्ध तांबे तयार होत होते. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जवळपास 11 हजार लोकांना रोजगार मिळाला.

हेही वाचा :  तरुणाईला लागलं कंडोम भिजवलेलं पाणी पिण्याचं व्यसन; Flavoured Condom च्या मागणीत वाढ

पुढील शंभर वर्षे मिळणार तांब्याचे साठे 

खेत्रीनगरसह कोलिहान, सिंघना,  बनवास, चांदमारी, धानी बसरी, बनीवाला की धानी, ढोलमाला, अकवाली, पचेरी, रघुनाथगढ, मकडो, बागेश्वर, खरखडा, श्यामपुरा, भिटेरा, जसरापूर, मुरादपूर आदी ठिकाणी देखील तांब्याच्या खाणी आहेत.  पुढील शंभर वर्षे येथे तांब्याचे साठे असल्याचे तज्ञ सांगतात. नवीन तंत्रज्ञानाने उत्खनन केल्यास आणि नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संशोधन केल्यास पुन्हा तांब्याचा साठा निर्माण होऊ शकतो. सध्या कोलिहान आणि बनवास खाणीतून तांबे उत्खनन केले जात आहे



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …