कधी चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते जान्हवी कपूर

Happy birthday Janhvi Kapoor: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते.  2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटामधून जान्हवीनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. जान्हवीच्या लूक्स, स्टाईल आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत… 

कोट्यवधींची मालकीण 

जान्हवी अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम करते. 2022 मधील एका मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी 58 कोटींची मालकीण आहे. जान्हवी एका चित्रपटासाठी जवळपास 5 कोटी मानधन घेते. तसेच तिचं जुहूमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. जान्हवीकडे आलिशान गाड्या देखील आहेत.  

हिट चित्रपटांमध्ये केलं काम

जान्हवीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. जान्हवीचा दोस्ताना-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

हेही वाचा :  Snehlata Vasaikar : 'जागतिक पुरुष दिना'निमित्त स्नेहलता वसईकरची खास पोस्ट

वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत 

जान्हवी तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. ‘कॉफी विथ करण 7’ या कार्यक्रमात करण जौहरने शिखर आणि जान्हवीच्या नात्यासंदर्भात भाष्य केलं होतं. जान्हवी आणि शिखर 2016 मध्ये एकमेकांना डेट करत होते, पण जान्हवीने अभिनयाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण आता ते पुन्हा एकत्र आल्याची चर्चा आहे. अभिनेता ईशान खट्टरसोबत देखील जान्हवीचं नाव जोडलं जात होतं. 

जान्हवी सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 21.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.  जान्हवी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Todi Mill Fantasy : मुंबईच्या आत खोल दडलेल्या वेदनेची फॅन्टसी; आता तरी प्रॅक्टिकल व्हा सांगणारं ‘तोडी मिल फॅन्टसी’



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …