ISRO कडून ‘यंग सायन्स प्रोग्राम’ सुरु, नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या

ISRO Young Scientist Programme 2022: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग सायन्स प्रोग्राम’ (Young Scientist Programme 2022) हा विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. यासाठी इस्त्रोकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इयत्ता नववीचे विद्यार्थी या विशेष कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. अर्ज करू इच्छिणारे सर्व विद्यार्थी अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात.

युविका YUva VIgyani KAryakram)नोंदणीची प्रक्रिया १० एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ वाजता संपेल. युविका २०२२ हा २ आठवड्यांचा निवासी अभ्यासक्रम आहे. १६ ते २८ मे २०२२ या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे.

इस्त्रोच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या निकषांनुसार, देशभरातील १५० विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे. इस्रोने पंचायत क्षेत्रात असलेल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. युविकासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. युविका २०२२ नोंदणी फॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषेचा राऊंड जिंकावा लागणार आहे.

JIPMER Recruitment 2022: जिपमरमध्ये विविध पदांची भरती
YUVIKA प्रोग्रामसाठी अर्ज असा करा अर्ज

हेही वाचा :  महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022

स्टेप १) अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जा.

स्टेप २) होमपेजवर, ‘युविका-२०२२ साठी नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.

स्टेप ३) उमेदवारांनी वेबपेजवर दिलेल्या लिंकद्वारे त्यांच्या ईमेलची नोंदणी करा.

स्टेप ४) एकदा ईमेल नोंदणीकृत झाल्यानंतर, उमेदवारांना प्रश्न देण्यात येतील.

HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती
स्टेप ५) युविका २०२२ साठी ई-मेल नोंदणी केल्यानंतर ४८ तासांच्या आत ऑनलाइन क्विझमध्ये उपस्थित राहावे लागेल.

स्टेप ६) क्विझ सबमिशनच्या ६० मिनिटांनी युविका पोर्टलवर लॉग इन करा आणि सर्व तपशील अचूक भरा.

स्टेप ७) ऑनलाइन अर्ज सबमिट करा आणि सबमिट केलेला फॉर्म डाउनलोड करा.

स्टेप ८) नोंदणीच्या शेवटच्या तारखेपूर्वी सही केलेली प्रिंट आणि सर्व आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.

BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड
या बाबी लक्षात घेऊन होणार निवड
विद्यार्थ्याने इयत्ता आठवीच्या परीक्षेत मिळवलेले गुण.
तीन वर्षांत विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांचा सहभाग (शाळा/जिल्हा/राज्य/शाळा/जिल्हा/राज्य आणि त्यावरील स्तरावर केंद्र सरकारच्या प्राधिकरणाद्वारे आयोजित)
ऑलिम्पियाड/विज्ञान स्पर्धा आणि समकक्ष (गेल्या ३ वर्षात शालेय/जिल्हा/राज्य आणि त्यावरील स्तरावर १ ते ३ रँक)
गेल्या तीन वर्षांत कोणत्याही प्रकारातील पारितोषिक.
गेल्या तीन वर्षांत स्काउट्स आणि गाईड्स/NCC/NSS चे सदस्य.
ऑनलाइन क्विझमध्ये प्रात्यक्षिक

हेही वाचा :  दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड पालिकेत महिलांना नोकरीची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …