IPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावना

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी आहे. देशात दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेला बसतात. देशातील सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी धोरणात्मक नियोजन, समर्पण आणि शिस्तबद्धता आवश्यक असते. देशातील अनेक तरुण दिवस-रात्र या नागरी सेवा परीक्षेसाठी तयारी करत असतात. त्यांच्या आयुष्यात ही परीक्षा उत्तीर्ण करणं हे एकमेव ध्येय असतं. पण काहींना मात्र कितीही प्रयत्न केले तरी यशाची चव चाखता येत नाही. अशामध्ये काहीजण खच्ची होतात तर काहीजण पुढील मार्ग निवडतात. 

नुकतंच एका आयपीएस अधिकाऱ्याची (IPS Officer) आपला रुममेट आणि खास मित्राशी भेट झाली. हा मित्र युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरला होता. या भेटीनंतर आयपीएस अधिकाऱ्याने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

आयपीएस अधिकारी अर्चित चंदक यांनी आम्ही एकत्र राहून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत होतो असं सांगितलं आहे. “काल हर्षला भेटलो. माझा युपीएससीची तयारी करतानाचा फ्लॅटमेट आणि जवळचा मित्र. प्रचंड मेहनती आणि समर्पित. नोकरी सोडून 4 वेळा परीक्षा आणि 3 मुलाखती दिल्या. पण दुर्दैवाने परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही,” असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

हेही वाचा :  दिव्यांग उमेदवारांनाही IPS, RPF आणि DANIPS साठी अर्ज करता येणार

दरम्यान या पोस्टमध्ये त्यांनी आपला मित्र हर्ष सध्या ट्रायडंट हॉटेलमध्ये काम करत असल्याचीही माहिती दिली आहे. “सध्या एका चांगल्या पॅकेजसह ट्रायडंट हॉटेलमध्ये मोठ्या पदावर काम करत आहे. कोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अर्चित चंदक यांनी या पोस्टमध्ये मित्रासोबतचा फोटोही शेअर केला आहे. फोटोत दोघांनी ब्लेझर घातला असून, हसताना दिसत आहेत. 

आयपीएस अधिकारी अर्चित चंदक यांची ही पोस्ट शेअर केल्यानंतर चांगलीच व्हायरल झाली आहे. तसंच यावर अनेकांनी कमेंट केल्या असून, युपीएससी म्हणजे जगाचा शेवट नाही. त्याच्याही पुढे चांगलं आयुष्य आहे असं एका युजरने म्हटलं आहे. तर एकाने लिहिलं आहे की, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे कठोर परिश्रम करणं.  जेणेकरून मी प्रयत्न केला नाही याची तुम्हाला खंत वाटू नये. किमान प्रयत्न करण्यासाठी उत्तम प्रेरणा”. दरम्यान, युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल 16 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा :  'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, ‘कोणतीही…’

Ajit Pawar Vs Yugendra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी …

‘मला हात लावू नका’, प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर…; पाहा VIDEO

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये चक्क महिला मुख्याध्यापकाला धक्क देत कार्यालयाबाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली …