Indians in America : अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर, एका वर्षात 65000+ भारतीय झाले अमेरिकन

American Community Survey data in Marathi:  अमेरिकन नागरिक बनणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढत आहे. असे असताना यूएस काँग्रेसच्या अहवालानुसार 2022 मध्ये 65,960 भारतीय अधिकृतपणे अमेरिकेचे नागरिक झाले आहेत. अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यात भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पहिल्या क्रमांकावर  2022 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यात मेक्सिकन आहेत. यूएस जनगणना विभागाने केलेल्या अमेरिकन समुदाय सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये एकूण 46 दशलक्ष परदेशी नागरिक अमेरिकेत वास्तव्यास होते. ही संख्या अमेरिकेच्या 33 कोटी 30 लाख लोकसंख्येच्या 14 टक्के आहे. एकूण 53 टक्के म्हणजेच दोन कोटी 45 ​​लाख नागरिक नैसर्गिक नागरिक म्हणून नोंदणीकृत आहेत.

मेक्सिकन लोकांकडे सर्वाधिक नागरिकत्व

15 एप्रिलच्या ‘यूएस नॅचरलायझेशन पॉलिसी’ अहवालानुसार आर्थिक वर्ष 2022 मध्ये 969,380 लोक अमेरिकन नागरिक बनले. तर अमेरिकन नियमांनुसार नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीत मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भारत, फिलीपिन्स, क्युबा आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील लोकांचा क्रमांक लागतो.

दरम्यान नवीन सीआरएसच्या अहवालानुसार , 2022 मध्ये मेक्सिकोमधील 1 लाख 28 हजार 878 लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आले. तर भारताचे 65 हजार 960, फिलिपाइन्सचे 53 हजार 413, क्युबाचे 46 हजार 913, डोमिनिकन रिपब्लिकचे 34 हजार 525, व्हिएतनामचे 33 हजार 246, चीनचे 27 हजार 38 नागरिकांना अमेरिकन नागरिकत्व दिले आहे. तर 2023 पर्यंत अमेरिकेत परदेशी जन्मलेल्या नागरिकांपैकी 28 लाख 31 हजार 330 लोक भारतातील होते. मेक्सिको (1,06,38,429) नंतर ही दुसरी सर्वात मोठी संख्या आहे. याशिवाय 22 लाख 25 हजार 447 लोक चीनचे आहेत. तर आतापर्यंत भारतात 2,90,000 भारतात जन्मलेल्या परदेशी नागरिकांना नागरिकत्व मिळाले आहे. 

हेही वाचा :  हा मुलगा बोलला की शिट्टी वाजायची, खेळता-खेळता एक चूक नडली!

नागरिकत्वाच्या प्रलंबित अर्जांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर, नागरिकत्व प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या USCIS ने प्रलंबित अर्जदारांची संख्या निम्म्याने कमी केली. आर्थिक वर्ष 2023 च्या अखेरीस, USCIS नागरिकत्वासाठी अंदाजे चार लाख आठ हजार अर्ज प्रलंबित होते. आर्थिक वर्ष 2022 पर्यंत ही संख्या साडेपाच लाखांवर पोहोचली. 
त्याचप्रमाणे 2021 पर्यंत ही संख्या आठ लाख 40 हजार आणि 2020 पर्यंत नऊ लाख 43 हजार झाली असती. 2023 या आर्थिक वर्षात ‘एलपीआर’ असलेल्या 8 लाख 23 हजार 702 नागरिकांनी नागरिकत्वासाठी अर्ज केले होते.

नैसर्गिक नागरिकत्व मिळवणाऱ्या होंडुरास, ब्राझील मागे

होंडुरास, ग्वाटेमाला, व्हेनेझुएला, मेक्सिको, एल साल्वाडोर आणि ब्राझीलमधील स्थलांतरितांचे प्रमाण सर्वात कमी. तर असे नागरिकत्व मिळविल्यात व्हिएतनाम, फिलिपिन्स, रशिया, जमैका आणि पाकिस्तानमधील स्थलांतरितांनी प्रमाण सर्वाधिक… 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …