‘हातात अगरबत्ती आणि वेफर’ सुबोधच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Subodh Bhave:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा त्याच्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतीच सुबोधनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. 

पाहा सुबोधची पोस्ट

सुबोधनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या नव्या चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. या पोस्टमध्ये सुबोध हा एका हातात अगरबत्ती आणि दुसऱ्या हातात वेफर धरुन उभा असलेला दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘हातात अगरबत्ती आणि वेफर. सुबोध भावे नक्की करतोय तरी काय? गुढ उलगडेल थेट नव्या वर्षात.‘वाळवी’ 13 जानेवारी 2023  पासून सर्वत्र प्रदर्शित.’


झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘दिसतं तसं नसतं’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाचे एक भन्नाट टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असून नवीन वर्षात म्हणजेच येत्या 13 जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे, शिवानी सुर्वे आपल्याला नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत आणि ही ‘वाळवी’ नेमकी कशाला लागली आहे, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इतक्या कुतूहलजनक आणि अनोख्या पद्धतीने चित्रपटाची घोषणा होणारा मराठीतील हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षक ‘वाळवी’ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

हेही वाचा :  चाहत्यांनी विचारले हटके प्रश्न; शाहरुख उत्तर देत म्हणाला...

यापूर्वी झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी  यांनी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व चि. सौ. का.’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसाठी आणले होते. या चित्रपटांनी फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर रसिक प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं.  आता पुन्हा एकदा ‘वाळवी’च्या निमित्ताने प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळणार आहे. आता ‘वाळवी’ हा चित्रपट रोमान्स आहे की बायोपिक, कॉमेडी आहे की फॅमिली ड्रामा? हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे. तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळवणाऱ्या ‘वाळवी’च्या निमित्ताने झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेची आणि परेश मोकाशी यांची ‘हॅट्रिक’ होत आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Vaalvi Teaser: ‘दिसतं तसं नसतं’; 13 जानेवारीला प्रदर्शित होणार ‘वाळवी’ , टीझर पाहिलात?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …