MIL DIL Relationship: सासूचा त्रास होतोय तर सुनेने कोणत्या कायद्याची घ्यावी मदत

घरात अनेक विषयांवरून वाद सुरू होतात. प्रत्येकाच्या घरात भांड्याला भांडं हे लागतंच. अनेकदा आपल्याच कुटुंबातील माणसं इतकी वाईट वागतात की खरंच हे आपल्याबरोबर घडलं आहे का? यावर विश्वास बसत नाही. पण सर्वात जास्त नात्यावर चर्चा होती ती म्हणजे सासू – सुनेच्या. सासू – सून वाद हा वर्षानुवर्ष आणि परंपरागत चालू आहे. आता अनेक घरात हा वाद होताना दिसत नाही. कारण लग्न झाल्यानंतर बरेचदा मुलं आपल्या बायकोसह वेगळे राहायला जातात. पण अनेक घरांमध्ये आजही एकत्र राहताना सासू आणि सुनेमध्ये वाद विकोपाला जातात. अनेकदा सासू आपल्या नात्याचा गैरवापर करत अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुनेशी वागताना दिसतात. पण सून आपल्याविरोधात होणाऱ्या या शोषणाविषयी नक्कीच कायद्याचीही मदत घेऊ शकते. पण अजूनही अनेक जणांना याविषयी माहिती नाही. त्यासाठी सासू – सुनेच्या नात्यात जर सुनेला त्रास होत असेल तिच्यासाठी ही महत्त्वाची माहिती दिली आहे वकील अजित भिडे यांनी.

हुंड्यासाठी सासू छळते

हुंड्यासाठी सासू बरेचदा सुनेचा छळ करते असे दिसून आले आहे. पण आपल्याच घरात आलेल्या दुसऱ्या घरातील एका मुलीला अशा पद्धतीने छळणं हे अत्यंत चुकीचे आहे. मुलीपेक्षा पैशाला अधिक महत्त्व देऊन हुंडा मागणं हे कधीच नातं पुढे घेऊन जाऊ शकत नाही. यासाठी सुनेने आवाज उठवणं अत्यंत गरजेचे आहे. IPC च्या कलम ४९८ए चा वापर करून कोणतीही सून याविरोधात सासूविरोधात तक्रार करू शकते आणि तो तिचा हक्क आहे. हुंड्यासाठी जर सुनेचा छळ होत असेल तर हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक ठिकाणी अशा वागण्यामुळे आजही सासू या व्यक्तीकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. तसंच पहिल्यापासूनच सासू आणि सुनेच्या नात्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

हेही वाचा :  Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: "हीच तुझी औकाद आहे," अमृता फडणवीस प्रियंका चतुर्वैदींवर संतापल्या, जोरदार भांडण

वाईटसाईट बोलणे आणि मारझोड

आजही अनेक गावांमध्ये अथवा अगदी मोठमोठ्या घरांमध्ये सासू आपल्या मुलाच्या आणि नवऱ्याच्या मदतीने सुनेला मारझोड करण्याच्या अनेक केसेस दिसून येतात. आई-वडिलांना त्रास होऊ नये याचा विचार करून बरेचदा अनेक मुली हे सहन करतात. पण हे सहन करणे योग्य नाही. कोणत्याही नात्यात हिंसा सहन करणे योग्य नाही. त्यातही सासू-सुनेचं नातं असेल तर त्याची एक वेगळीच बाजू असते. एखाद्या सुनेची सासू जर तिला वाईटसाईट बोलत असेल अथवा मारझोड करत असेल तर सहन करत राहण्यापेक्षा घरगुती हिंसाचार कायद्याची मदत घ्यावी. डोमेस्किट व्हायलन्स अॅक्ट या नावाने ओळखला जाणारा कायदा सुनेसाठी फायदेशीर ठरतो.

कायद्याची मदत घेऊन सून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची नक्कीच दाद मागू शकते. पण अनेकदा आजही महिला समाजाचा विचार करून स्वतःला त्रास करून जगत असल्याचेही दिसून येते. पण हे टाळण्यासाठी मुळात सासू आणि सुनेचं नातं कसं असावं हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे.

(वाचा – हो! त्याला प्रेम व्यक्त करता येत नाही…पण याचा अर्थ असा नाही की)

सासू आणि सुनेने करावी मैत्री

कायद्याच्या चौकटीत जर यायचे नसेल आणि तर अगदी पहिल्यापासून सासू आणि सुनेने आपल्यात जास्तीत जास्त मैत्रीचे नाते निर्माण व्हावे याचा प्रयत्न करावा. भांडण, मतभेद हे सर्वच नात्यात असतात, पण ते वेळीच सोडवणे आणि एकमेकांना जपून वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कायद्याची मदत घेण्यापेक्षा नाती जपून अधिक लवकर पुढे जाता येते आणि आयुष्यात त्रासही कमी होतो.

हेही वाचा :  घरातच रिपेयर करा एसी, खूपच सोपी आहे प्रोसेस, या ८ स्टेप्स फॉलो करा

(वाचा -नवरा व सासूमध्ये रोज मरण माझं होतंय, नवरा प्रत्येक गोष्टीत रडगाणं गात बसतो आणि सासूची त-हा ऐकून तर व्हाल थक्कच)

एकमेकांना महत्त्व देणे गरजेचे

सासू आणि सून या नात्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता आपल्या आयुष्यात एखादी नवी व्यक्ती येत आहे आणि त्या व्यक्तीला महत्त्व द्यायचे आहे असा विचार केल्यास, भांडण आणि हेवेदावे राहणार नाहीत. सासू – सून हे अत्यंत नाजूक नाते आहे. हे नातं टिकविण्याची जबाबदारी केवळ सासूची नाही. तर आठवडाभर सून ऑफिसची कामं करत असेल तर तिला सांभाळून घेणे सासूचे काम आहे आणि सुट्टीच्या दिवशी सासूला आराम देण्याचे काम सुनेचे आहे. हे एकमेकांमध्ये समजून घेतले तर सासू – सुनेचे नाते कधीच खराब होणार नाही. तसंच या नात्यात कडवटपणा यायची गरजही भासणार नाही. या नात्याची सुरुवात करताना मुळातच डोक्यात कोणताही पूर्वग्रह न ठेवता सुरूवात करावी. जेणेकरून याचा त्रास होणार नाही.

सासू आणि सुनेच्या नात्यात येणारा कडवटपणा पटकन कमी होऊ शकत नाही. तुमच्याकडून सगळ्या चांगल्या गोष्टी करूनही सासूकडून त्रास होत असेल तर मात्र नक्कीच कायद्याची मदत घ्यावी. मात्र त्याआधी हे नातं जपण्याचा नक्की प्रयत्न करावा.

हेही वाचा :  सासू-सुनेची जोडी जिममध्ये करते पॉवरलिफ्टिंग , या ५ गोष्टी करुन तुम्हीही तुमच्या नात्यात आणा गोडवा

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratime.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …