शेतकऱ्याचा मुलगा साहेब होतो तेव्हा.. पहिल्या प्रयत्नात मिळवले उपजिल्हाधिकारी पद !

MPSC Success Story : आपल्या उराशी जिद्द असली की कोणतेही यश मिळवता येते. तसेच, विनायकला शिक्षणाविषयी जिद्द होती. मोठा अधिकारी होणारच, असे त्याने मनाशी ठरविले होते. आम्ही त्याला काही कमी पडू दिले नाही. आमच्या कष्टाचे चीज झाले. मुलगा उपजिल्हाधिकारी झाला.

भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले विनायक नंदकुमार पाटील.त्याचे शालेय शिक्षण हे. परशराम बाळाजी पाटील शिक्षण संकुलात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्यांना बारावी परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले होते.

त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. याच जोरावर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे बी. एस्सी. पदवीचे शिक्षण घेतले. या दरम्यान, त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. पण हा प्रवास काही सोप्पा नव्हता. आपल्या घरच्या प्रतिकूल परिस्थितीने सतत जाणीव पदोपदी जाणवत होती. त्यामुळे त्याने पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली. आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर अधिकारी व्हावे लागेल हा विचार मनात पक्का करून त्यांनी निष्ठेने अभ्यास केला. त्याने पुणे व कोल्हापुरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून विविध परीक्षा दिल्या. त्यांनी प्रथम विक्रीकर अधिकारी पदाची परीक्षा दिली. यात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यानंतर त्याने उपजिल्हाधिकारी पदाकडे लक्ष केंद्रित केले. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली.

हेही वाचा :  भारतीय नौदलात 910 जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

याच मेहनतीच्या जोरावर तो राज्यात प्रथम आला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. त्यास ६२२ गुण मिळाले आणि तो उपजिल्हाधिकारी झाला. शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा साहेब होतो तेव्हा गावासाठी निराळी प्रेरणा बनतो. या यशाने आई-वडिलांसह गावकऱ्यांचा ऊर भरून आला आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पतीचा पाठिंबा आणि काजलची जिद्द ; अखेर काजल झाली IAS अधिकारी !

UPSC IAS Success Story : कोणत्याही परिस्थितीसोबत सामना करायला घरच्यांचा पाठिंबा असेल तर स्वप्न लगेच …

कोकण रेल्वे मार्फत विविध पदांसाठी भरती ; वेतन 56,100 पर्यंत

Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र …