खर्च भागवण्यासाठी वृत्तपत्र विकले, उधार नोट्स घेऊन अभ्यास केला, आता बनले IAS अधिकारी

गरिबीतूनही IAS अधिकारी होण्यापर्यंतचा निरीश राजपूत यांचा प्रेरणादायी प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा होता. त्यांनी वेळप्रसंगी छोटी कामे केली. आर्थिक चणचणीतील परिस्थितीवर मात करून कुटूंबाला देखील आधार दिला. मध्य प्रदेशातील, निरीश राजपूतचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे वडील शिंपी म्हणून काम करत होते.

खाजगी शाळेची फी भरण्यास देखील पैसे नसल्याने निरीशने त्याच्या शिक्षणासाठी सरकारी शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर निरीश आपल्या ग्वाल्हेरला शिफ्ट झाले. त्यांनी तिथे बीएस्सी आणि एमएस्सी पदवी पूर्ण केली. नोट्स तयार करण्यासाठी किंवा कोचिंग घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. काम करून प्राथमिक गरजा भागवल्या‌. इतकेच नाहीतर पदवी आणि पदव्युत्तर पदवी दोन्हींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांची ही हुशारी बघून एका मित्राने त्याला सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्याची ऑफर दिली आणि त्या बदल्यात अभ्यास साहित्य देण्याचे आश्वासन दिले.

आपल्या मित्रावर विश्वास ठेवत निरीशने आपल्या आयुष्यातील दोन वर्षे संस्थेला वाहून दिली आणि संस्थेच्या वाढीस हातभार लावला. मात्र, यश मिळाल्यावर त्याच्या मित्राने शैक्षणिक साहित्य दिलेच नाही.यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आणि दोन वर्षे कोणतीही प्रगती करता आली नाही. पण भूतकाळाला बळी पडण्याऐवजी त्याने ताकद दाखवली, दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू ठेवण्यासाठी दुसऱ्या मित्राकडून अभ्यासाचे साहित्य घेतले.

हेही वाचा :  UPSC तर्फे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 577 जागांवर भरती (DAF)

दिल्लीला पोहोचल्यावर मर्यादित शैक्षणिक साहित्य आणि पैशांसह अभ्यास सुरू केला अभ्यासाबरोबरच वर्तमानपत्रे विकणे अशा विविध अर्धवेळ नोकऱ्या केल्या. कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. निरीश दिवसाचे अठरा तास अभ्यास करायचे. पहिल्या तीन प्रयत्नात अयशस्वी होऊनही ते प्रयत्न करत राहिले. या संपूर्ण परिश्रमातून त्यांनी ३७० वा क्रमांक मिळवत आय.ए.एस पदाला गवसणी घातली.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आश्रमशाळेतील मुलगा ते आय.ए.एस अधिकारी; मजूराच्या मुलाची ही यशोगाथा!

UPSC IAS Success Story : मजूरांचे आयुष्य हे पूर्णतः स्थलांतरित होत असते. ज्या ठिकाणी पोटाची …

कठीण परिस्थितीचा सामना करत रंगकाम करणाऱ्याची लेक बनली उद्योग निरीक्षक!

MPSC Success Story : कोणत्याही सुख सोयीचे वातावरण नसतानाही रूपाली तुकाराम कापसे हिने बारावी पासूनच …