स्टेडिअमच्या होर्डिंगखाली गाडली गेली कार; भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू

Shocking News : उत्तर प्रदेशची (UP News) राजधानी लखनऊमध्ये होर्डिंग (Hoarding) पडून आई आणि मुलीचा मृत्यू झाला. लखनऊच्या एकना स्टेडियमजवळ (Ekana Stadium) हा अपघात झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग पडले आणि त्याच्या कचाट्यात स्कॉर्पिओ गाडी आली. कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळ गाठून तिघांची सुटका केली. तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दोन जणांना वाचवता आले नाही.

लखनऊमधील अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियममध्ये जोरदार वादळामुळे तिथे लावलेले होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली तीन जण दबले गेले. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग पडल्याने स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले. त्यात बसलेल्या दोन महिलांना रुग्णालयात आणले असता त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर चालकाला वाचवण्यात यश आले आहे.

होर्डिंग पडल्याने गाडीचेही नुकसान झाले असून जेसीबीने ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, UP78 CR2613 या स्कॉर्पिओ वाहनावर हा होर्डिंग पडला. या भीषण अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. होर्डिंग पडल्यामुळे चुराडा झालेल्या कारमध्ये एक महिला आणि एक पुरुष दिसत आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर तिघांनाही गाडीतून बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये 38 वर्षीय प्रीती जग्गी आणि त्यांची 15 वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे. आई आणि मुलगी फिनिक्स मॉलमध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यांची गाडी सरताज चालवत होता. अपघातात जखमी झालेल्या सरताजवर उपचार सुरू आहेत.

हा अपघात पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळातच पोलीस, अग्निशमन दल आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर तिघांनाही एक एक करून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तिघांनाही लोहिया रुग्णालयात नेले. मात्र प्रीती आणि त्यांच्या मुलीचा या अपघातात मृत्यू झाला होता.

हेही वाचा :  आंघोळीला जाण्याच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; बायको आणि पत्नीलाही मारलं

होर्डिंग बरेच मोठे होते त्यामुळे ते एका मोठ्या लोखंडी अँगलवर बसवण्यात आले होते. अपघाताच्या वेळी हलके वारे वाहत होते. त्यामुळे कोणतेही बांधकाम होत नसताना किंवा जोरदार वादळ नसतानाही हे होर्डिग कसे पडले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेत मोठा निष्काळजीपणा झाल्याची शक्यता आहे. चौकशी झाल्यावर सर्व तथ्य बाहेर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातानंतर फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. यावेळी प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते. या अपघातामागील कारण काय, याबाबत एलडीए आणि शहर पथकाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावरून तपास सुरू केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रीती आणि तिचा पती दीपक यांचा आठ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती तिच्या माहेरच्या घरी आई आणि भावासोबत राहत होती. प्रितीच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती सॉफ्टवेअर डेव्हलपर होती. प्रितीचा भाऊ मोहितने सांगितले की, बहिणीचा सोमवारी उपवास केला होता. ती ज्यूस प्यायला बाहेर गेली होती. यावेळी मुलीला बाहेर फिरवण्याच्या उद्देषाने ती मॉलमध्ये घेऊन गेली होती. मात्र त्या दोघेही परत घरी येणार नाहीत असं वाटलं नव्हतं.

हेही वाचा :  Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …