हट्टी Blackhead ला ‘या’ उपायांनी मुळासकट काढून टाका

अनेकदा चेहरा काचेसारखा सुंदर असला तरीही नाकावरील ब्लॅकहेड्स सगळ्यांच लक्ष वेधून घेतात. बऱ्याचदा संपूर्ण चेहरा स्वच्छ असतो. पण नाक मात्र तेलकट आणि ब्लॅकहेड्सने भरलेलं असतं, अशावेळी लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. रोजच्या खाण्यातील पदार्थ, चुकीच्या स्किन केअर उत्पादनांच्या वापरामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईहेड्स वाढत जातात. पण बराच काळ ब्लॅकहेट्स काढून टाकण्याचे मास्क लावूनही हवातसा ग्लोईंग लूक मिळत नाही. नाकावर, गालांवर आणि हनुवटीवर ब्लॅकहेट्स येतात. ब्लॅकहेट्स काढण्यासाठी अनेक जेल देखील आहेत पण त्याचा हवा तसा उपयोग होत नाही. यासाठी तुम्ही घरगुती उपाय करु शकता. यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. (फोटो सौजन्य :- @Istock, @Pexels)

अंड्याचा वापर करा

अंड्याचा वापर करा

अंड्याच्या आतील पांढऱ्या भागात ॲल्बुमिन नावाचा घटक आढळून येते. अंड्यामधील हा घटक त्वचेत असलेल्या अतिरिक्त तेलाला कमी करण्यात मदत करतो. अंड्याचा पांढरा भाग सूक्ष्म छिद्र आक्रसण्यातही मदत

  • असा करा हा उपाय
  • हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा.
  • हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि 15-20 मिनिटे कोरडे होऊ द्या.
  • आता कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
  • तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
हेही वाचा :  ब्रेकअपपेक्षा भयानक आहे Ghosting..संकल्पना ऐकून डोक्यातील नस उडू लागेल

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी बेकिंग सोडा जादूई काम करेल. हा उपाय करण्यासाठी एका चमचे बेकिंग सोडामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. 10-15 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. हे मिश्रण एक्सफोलिएटर म्हणून काम करते.

हळदची असाही वापर

हळदची असाही वापर

हळदीमुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि त्वचेची खोलवर स्वच्छता देखील होते.अँटिऑक्सिडंटने समृद्ध हळद ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. हा उपाय करण्यासाठी हळदीमध्ये खोबरेल तेल घाला आणि आणखी पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून ठेवा आणि हे मिश्रण धुवा. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता.

आहारात बदल

आहारात बदल

रोजच्या खाण्यातील पदार्थ, चुकीच्या स्किन केअर उत्पादनांचा वापर यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईहेड्स वाढत जातात. ब्लॅकहेट्स काढून टाकण्याचे मास्क लावूनही हवातसा ग्लोईंग लूक मिळत नाही. नाकावर, गालांवर आणि हनुवटीवर ब्लॅकहेट्स येतात. त्यामुळे आहारातील तेलकट पदार्थ कमी करा.

बॉबी पिन्स वापर

बॉबी पिन्स वापर

स्क्रबिंगसाठी साखर, मध लिंबू एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा त्यानंतर बॉबी पिन्सचा काळजीपूर्वक वापर करून ब्लॅकहेड्स काढून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावा. ब्लॅकहेड्सची समस्या मुख्यतः घाण आणि तेलामुळे होऊ शकते. ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण ते चोळून,खेचून काढण्याचा प्रयत्न करतात. असे करणे टाळावे. नियमितपणे चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

हेही वाचा :  नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली, महापालिकेच्या रुग्णालयातील संतापजनक प्रकार

ब्लॅकहेड्स कसे काढावेत ?

तांदळाचे पीठ

तांदळाचे पीठ

तांदळाचे पीठ त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते त्याच प्रमाणे हे त्वचेवरील पोअर्स ओपन करण्याचे काम करते. तांदळाचे पीठ उत्तम स्क्रबर म्हणून कार्य करते. या मिश्रणामध्ये तुम्ही कोरफड जेल टाकू शकता. या जेलमुळे
त्वचा मऊ, नितळ व सुंदर होण्यास मदत मिळते. त्वचेसाठीचा हा उपाय अतिशय रामबाण आहे. यामुळे ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्सची समस्या उद्भवणार नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …