H3N2 Virus: देशात नवा व्हायरस? कोणतंही औषध घेतलं तरी खोकला जाईना, ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

H3N2 Virus: देशात सध्या नव्या व्हायरसची साथ पसरली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं कारण म्हणजे संपूर्ण देशभरात अनेकांना खोकला, ताप अशी लक्षणं जाणवत आहे. यावर कोणतंही औषध घेतलं जरी खोकला जात असल्याने अनेकांना चिंता सतावत आहे. दरम्यान खोकला जात नसल्याने डॉक्टरांकडेही रांगा लागत आहेत. दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) यामागील कारण स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात ताप (Fever) आणि खोकल्याच्या (Cough) घटना वाढण्यामागे ‘इन्फ्लुएंजा ए सबटाइप H3N2’ व्हायरस (Influenza A subtype H3N2) आहे. हा व्हायरस H3N2 व्हायरसचा उपप्रकार असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे. यामुळेच संपूर्ण देशात नवा आजार बळावला आहे. 15 पेक्षा कमी आणि 50 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना याची लागण होत असल्याचा निष्कर्ष समोर आली आहे.

या व्हायरसमध्ये सतत खोकला आणि ताप अशी लक्षणं जाणवत आहेत. इतर फ्लूंच्या तुलनेत या H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे. लागण झालेल्यांना खोकला आणि तापासह सर्दी, मळमळ, अंगदुखी, उलट्या अशी लक्षणंही जाणवत आहेत. दरम्यान, हा आजार जीवघेणा नसल्याचं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा :  कल्याण पुन्हा हादरले! अल्पवयीन तरुणावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला

आयसीएमआरने H3N2 पासून सुरक्षित राहण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, लोकांना नियमित हात धुण्याचा तसंच सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच लक्षणं जाणवत असल्यास मास्क घालणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात ठेवणं, डोळे आणि नाकाला स्पर्श न करणं असे सल्ले देण्यात आले आहेत. ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घेण्यास सांगण्यात आलं आहे. 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनाही अशा रुग्णांवर उपचार करताना फक्त लक्षणांवर औषधं द्यावीत अशी सूचना करण्यात आली आहे. उपाचारादरम्यान प्रतिजैविकांचा वापर करु नये असं आयसीएमआरने सांगितलं आहे. 

गेल्या काही आठवड्यांपासून H3N2 चे रुग्ण वाढले आहेत. 100 हून अधिक चाचण्या करण्यात आल्या असता त्यात अनेकजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान आयएमएच्या स्थायी समितीने दिलेल्या माहितीनुसार, हा ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला मात्र तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो. 

करोना काळात मोठ्या प्रमाणात ‘अ‍ॅझिथ्रोमायसिन’ आणि ‘अमॉक्सिक्लाव्ह’सारख्या प्रतिजैविकांचा वापर करण्यात आला होता. पण याचा जास्त वापर झाल्याने गरजेच्या वेळी शरिरात प्रतिकारशक्ती निर्माण होत नसल्याने त्यांचा प्रभाव होत नाही. 

हेही वाचा :  शिंदे गट अस्वस्थ? एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …