चार डोळे अन्…; मच्छिमाराच्या जाळ्यात फसला विचित्र मासा, प्रजातीची माहिती ऐकताच गावकरीही चकित

Trending News: मच्छिमाराच्या जाळ्यात एक अनोखा मासा फसला आहे. हा विचित्र मासा पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकच गर्दी केली आहे.  तर नक्की हा मासा कोणत्या प्रजातीचा आहे हे पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. ही घटना परदेशात नव्हे तर आपल्या भारतातच समोर आली आहे. बिहार राज्यातील बेतियामध्ये ही घटना उघडकीस आली आहे. 

बेतिया जिल्ह्यातील लैरिया येथील लाकड गावात ही विचित्र आणि अनोखा मासा सापडला आहे. या गावाच्या जवळूनच एक नदी वाहते. त्या नदीत मच्छिमार मासेमारी करतात. मासेमारी करत असताना एका मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा आला आहे. या माशाला चार डोळे आहेत तर विमानासारखे या माशाचे शरीर आहे. करडा रंग असून त्यावर सफेद रंगाची नक्षी आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सकरमाउथ कॅटफिश (Suckermouth catfish) असं या माशाचे नाव असून या प्रजातीचे मासे साधारणतः अमेरिकेतील नदीत सापडतात. 

हा विचित्र आणि अनोखा मासा पाहण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. जाणकारांच्या मते, सकरमाउथ कॅटफिश अमेरिकेतील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्तकरून आढळले जाते. या प्रजातीचे मासे एका दुसऱ्या माशांची अंडी खातात. त्यामुळं दुसऱ्या प्रजातींच्या माशासाठी हे मासे धोकादायक ठरतात, असं म्हटलं जातं. 

हेही वाचा :  क्रुरता! सासुने सुनेच्या बांगड्या फोडल्या, नंतर तोंडात कोंबून डोकं भिंतीवर आपटलं

गावाचे स्थानिक वीरेंद्र चौधरी यांच्या जाळ्यात या प्रजातीचे दोन मासे सापडले आहेत. सध्या त्यांनी घरातच या माशांना सुरक्षित ठेवले आहे. तसंच, अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. 

अमेरिकेतील नदीत आढळतो मासा

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आढळणारी ही माशांची प्रजाती काही लोकांनीच भारतात आणली होती. घरातील फिश टँकमध्ये ठेवून घराची शोभा वाढवण्यासाठी सकरमाउथ कॅटफिशचा वापर लोकं करायचे. मात्र, त्यानंतर या दुर्मिळ प्रजातीला नदीत सोडण्यात आले. त्यानंतर भारतातील गंडक, कोसी, गंगासारख्या नद्यांमध्ये हा मासा दिसू लागला. 

दुसऱ्या माशांसाठी धोकादायक 

सकरमाउथ कॅटफिश या माशाचे प्रजनन जास्त वेगाने होते. त्याचबरोबर इतर जलचरांसाठी हा मासा धोकादायक आहे. म्हणजेच इतर माशांची अंडी खाण्याबरोबरच दुसऱ्या माशांनाही ही प्रजाती भक्क्ष करते. त्यामुळं नदीत या मासा असणे धोकादायक मानले जाते. 

सकरमाउथ कॅटफिश बिहारमध्ये सापडल्यामुळं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माशाला चार डोळे असल्यामुळं तो दिसायला विचित्र दिसत असल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या या माशाला मच्छिमाराने त्याच्या घरातच सुरक्षित ठेवले आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. …

‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधं AM, PM…’

दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून …