Government Job: तुम्ही शोधताय सरकारी नोकरी? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

MSRTC Recruitment 2023: गेल्या काही महिन्यांपासून खासगी तसेच सरकारी विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनानंतर बहुतांश जग पूर्वपदावर आलेले असताना पुन्हा एकदा नवीन सुरुवात जोमाने व्हावी, यासाठी अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्या नोकरभरतीची प्रक्रिया राबवली जाते. यातच आता राज्याची लालपरी म्हणजेच गावागावात सेवा देणाऱ्या एसटीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

दरम्यान दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना एसटी महामंडळाअंतर्गत नोकरी करण्याची संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर इथे जागा भरती निघाली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून अर्जाची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

वाचा: सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी, ‘अमूल’चं दूध महागलं, ‘असे’ असतील नवे दर 

किती आणि कोणत्या पदांवर पदभरती होणार?

एकूण पदे – 37

1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) – 05 पदे
2) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder – 06 पदे
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician – 03 पदे
4) वेल्डर (गॅस व इले.) / Welder – 09 पदे
5) पेंटर (सामान्य) / Painter (General) – 02 पदे
6) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic – 12 पदे

हेही वाचा :  100,000,000,000 ! व्हिएतनाममध्ये सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती

अर्ज ऑनलाइन पद्धतीने शक्य

नोकरीचं ठिकाण – नागपूर

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास, 12 वी पास, आयटीआय, डिप्लोमा यापैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

परीक्षा फी – नाही.

अर्ज कुठे करावा?

 www.msrtc.gov.in या अधिकृत वेवसाइट वर अर्जासंबंधीत सर्व माहिती उपलबद्ध आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …