Gold Price Today : घाई करु नका! आज ‘इतक्या’ रुपयांनी सोने महाग, तर चांदी…जाणून घ्या दर

Gold Silver Price on 19 April 2023 :  जर तुम्हाला सोन्याचे (Gold Rate) दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.  जर तातडीने सोने खरेदी करण्याची गरज नसेल, तर तुम्ही आणखी काही दिवस वाट पाहू शकता. कारण विचार न करता लगेच सोने खरेदी केल्यास नुकसान होऊ शकते. दरम्यान ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सोन्याची वाढते दर पाहता अनेकांनी सोने खरेदी थांबवल आहे. याचा फटका देखील आता मार्केटमध्ये अनेकांना बसत आहे. परिणामी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 60,450 रुपये आहे. तर चांदी 75,460 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की तपासा…

सोन्याचे दागिने खरेदी करताना सर्वप्रथम आजच्या बाजारातील भाव तपासा मगच सोने खरेदी करा. स्थानिक ज्वेलर्स असोसिएशन, परदेशी बाजारातील किमतीनुसार स्थानिक पातळीवर सोन्याची किंमत ठरवली जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही जर दिल्लीत सोने खरेदी केल्यास, दिल्ली बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या सोन्याची किंमत जाणून घ्या. याशिवाय दोन्ही ज्वेलर्सकडून सोन्याची किंमत जाणून घेऊन मगच खरेदी करा. 

हेही वाचा :  उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्या

वाचा : अपेक्षांवर खरा उतरला अर्जुन तेंडुलकर, रोहित शर्मा काय म्हणाला….

तुमच्या शहरातील सोन्याचे दर

आज (19 एप्रिल 2023) सराफा बाजारात मुंबईत (Mumbai Gold rate) 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,413 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,450 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,413 असेल आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,450 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 55,422 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 60,460 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,422 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 60,460 रुपये आहे. 

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.

हेही वाचा :  Assembly Election 2022 Exit Poll Results : उत्तराखंडमध्ये भाजपा पुन्हा सत्तेच्या मार्गावर, तर मणिपूरमध्येही भाजपाकडे असणार बहुमत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …