विधान परिषदेसाठी घोडेबाजार तेजीत? निवडणूक अटळ, 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

Vidhan Parishad Election 2024:  विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे.. त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.. महाविकास आघाडीनं संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्त उभा केलाय. विधान परिषदेच्या या मैदानात राज्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याचं पाहायला मिळतंय.  त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पक्षनिहाय उमेदवार

पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार आहेत. कृपाल तुमाने, भावना गवळी हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत.  शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  उमेदवार आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव,  शिवसेना ठाकरे गटाचे  मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे  जयंत पाटील हे महाविकासआघाडीचे उमेदवार आहेत. 

संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीचे 69 आमदार आहेत. त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, मविआनं तीन उमेदवार दिल्यानं निवडणुकीत रंगत आलीय.. यामधलं एक महत्वाचं नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर. नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आहेत.. त्यांना विधान परिषदेमध्ये उतरवण्याचं कारण म्हणजे त्यांचे सर्वपक्षीय नेते आणि आमदारांशी असलेले सलोख्याचे संबंध.

हेही वाचा :  UPI Payment वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट

अगदी शिंदेंच्या शिवसेनेतीलही काही मतं नार्वेकरांना मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.. मागील काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर हे भाजपच्या काही नेत्यांशी गुप्तगु करताना पाहायला मिळालं.. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, राम कदम यांच्याशी मिलिंद नार्वेकरांची झालेली चर्चा हा चर्चेचा विषय ठरलाय… त्यामुळे भाजपचे आमदारही नार्वेकरांना मदत करणार का अशी चर्चा सुरू झालीय.

शिवसेना ठाकरे गटाच्या या खेळीमुळं धोक्यात आलेले उमेदवार म्हणजे शेकापचे जयंत पाटील… आता जयंत पाटलांना महायुतीचे किंवा काही अपक्ष आमदार मदत करणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे.. 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे असल्यानं नेमका कुणाचा गेम होतो, ते पाहायचं…
  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Rain : पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’, ‘या’ तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Pune Heavy Rain : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यात 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा …

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Rain Alert : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातले आहे. कोकणात पावसाने कहर केला आहे. …