तुनिषा शर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Tunisha Sharma Last Rites: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी जगाचा निरोप घेतला.  मीरा रोड  येथील गोडदेव स्मशानभूमीमध्ये तुनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता विशाल जेठवा, अभिनेत्री रोशनी वालिया, अभिनेत्री स्वीटी वालिया तसेच काही सेलिब्रिटी तुनिषा शर्माच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते.

शिझान खानची आई आणि त्याची बहीण हे देखील तुनिषा शर्माच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते.

News Reels

तुनिषा शर्माचा व्हिडीओ:

तुनिषा शर्माचा एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये शिझान खान हा तुनिषाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. 

तुनिषा शर्माच्या पार्थिवावर 25 डिसेंबर 2022 रोजी अंत्यसंस्कार होणार होते. पण तिची मावशी मुंबईत नसल्याने अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले. 

हेही वाचा :  थर्ड आय आशियाई महोत्सवाची 12 डिसेंबर पासून सुरुवात; आशा पारेख यांचा होणार सन्मान

अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी ‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या मालिकेतील तुनिषाचा सहकलाकार आणि तिचा खास मित्र शिझान मोहम्मद खान याच्या विरोधात तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तुनिषा आणि शिझान रिलेशनमध्ये होते. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे तुनिषा नैराश्याला बळी पडली होती. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. तुनिषाच्या निधनानं अनेकांना धक्का बसला. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Sheezan Khan : पोलिसांसमोरच शिझानला कोसळलं रडू, गर्लफ्रेंड तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी सलग तीन दिवसांपासून कसून चौकशी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …