या खास व्यक्तीने केली होती श्लोका आकाशच्या लग्नाची सर्व तयारी, लेहेंग्यावर साकारण्यात आली होती Lovestory

सन 2019 मध्ये, 9 मार्च रोजी अंबानी कुटुंब त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचे लग्न झाले. ईशा अंबानीच्या लग्नाप्रमाणेच आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे लग्न देखील एक भव्य कार्यक्रम होता, ज्याची तयारी संपूर्ण अंबानी कुटुंबाने काही महिन्यांपूर्वीच सुरू केली होती.या शाहीसोहळ्याला 800 लोक पाहुणे म्हणून आले होते, सेव्हन स्टेप्स वेडिंग प्लॅनर कंपनीने या लोकांची उत्तम व्यवस्था केली होती.

आता अंबानींच्या घरात लग्न म्हणल्यावर चर्चा तर होणारच वधू-वरांच्या पोशाखापासून सर्वच गोष्टी खूप खास होत्या. इतकंच नाही तर यादरम्यान त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आकाश अंबानी आणि श्लोका मेहता दोघेही एकमेकांच्या भावनांचा आदर करू आणि आपल्या वैवाहिक जीवनाची जबाबदारी पार पाडू, असे वचन देत आहेत. यासर्वामध्ये श्लोकाच्या लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. (फोटो सौजन्य: योगेन शाह/@abujanisandeepkhosla/@kreshabajajofficial Instagram)

हॉलिवूड गायक ठरले मुख्य आकर्षण

हॉलिवूड गायक ठरले मुख्य आकर्षण

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नात हॉलिवूडमधील गायक हे मुख्य आकर्षण ठरले होते. कोल्डप्ले-चेनस्मोकर्स आणि ख्रिस मार्टिन यांच्या गाण्यानी कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचवेळी संपूर्ण बॉलिवूड या लग्नात सामील झाले होते, ज्यांच्यामध्ये देश-विदेशातील नामांकित सेलिब्रिटींचा सामवेश आहे. रिपोर्ट्सनुसार, लग्नात 800 पाहुणे उपस्थित होते अशा परिस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी कोणी घेतली हा पहिला प्रश्न मनात येतो. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या शाही लग्नाप्रमाणे हे लग्नही वेडिंग प्लॅनर कंपनी सेव्हन स्टेप्सने प्लॅन केले होते. सेव्हन स्टेप्सच्या संपूर्ण टीमने आकाश आणि श्लोकाच्या लग्नाला विशेष बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

हेही वाचा :  प्रजासत्ताक दिनाला भरभरून खाल्लेल्या जिलेबीचे Health Benefits जाणून घ्या

(वाचा :- सबसे कातिल गौतमी पाटील, लवकरच Web series मध्ये झळकणाऱ्या गौतमीच्या ग्लॅमरस अंदाजावर नजर टाकाच) ​

या डिझायनरने तयार केला नववधूचा लेहेंगा

या डिझायनरने तयार केला नववधूचा लेहेंगा

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या ब्रायडल लुकनंतर सर्वांच्या नजरा श्लोका मेहताच्या लुककडे लागल्या होत्या. अंबानी कुटुंबाची नववधू श्लोका कशी दिसते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ईशाप्रमाणेच, श्लोकाचा लेहेंगा देखील भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला. या लेहेंग्याला लाल आणि सोनेरी रंगाने बनवण्यात आले होते . या लेहेंग्यावर हाताने भरतकाम केले होते. श्लोकाने या लेहेंग्यासोबत दोन दुपट्टे कॅरी केले होते, ज्याच्या जोडीला चोलीमध्ये स्कर्टच्या भागाप्रमाणे एम्ब्रॉयडरी होती.

(वाचा :- अर्थमंत्र्यांच्या पेहरावातून दिसून येते भारताच्या संस्कृतीची झलक,Union budget 2023 सादर करताना नेसली ही साडी)

असा बनवला लेहेंगा

असा बनवला लेहेंगा

लग्नाप्रमाणेच श्लोकाचा मेहंदीचा लेहेंगा देखील खूपच सुंदर ठेवण्यात आला होता. या लेहेंग्यावर आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची संपूर्ण प्रेमकथा बनवण्यात आली होती. इतकेच नाही तर या आउटफिटवर आकाश अंबानीने श्लोकाला प्रपोज केलेल्या ठिकाणाचे नावही नमूद केले होते. त्याचबरोबर लग्नाची तारीख, नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची नावेही त्यात लिहिली होती. या व्यतिरिक्त, श्लोकाचा हा लेहेंगा 50,000 क्रिस्टल-सेक्विन्स आणि काचेच्या मणींनी सजवला होता.
(वाचा :- जाळीदार ड्रेसमध्ये मालती मेरीच्या आईचा ग्लॅमरस अंदाज, प्रियांका चोप्राचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल)

हेही वाचा :  सूटा-बुटात राहणारे अब्जाधिश मुकेश अंबानींचे आजकाल बदलले आहेत अदाअंदाज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …