Elon Musk यांच्या स्वप्नांचा चुराडा, Starship Rocket हवेतच फुटल्यावर अशी दिली रिअ‍ॅक्शन; पाहा Video

Starship Rocket Explodes: इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या अंतराळ संशोधन कंपनी म्हणजेत स्पेसएक्सने (SpaceX) गुरुवारी त्यांच्या स्टारशिप रॉकेटची (Starship Rocket) पहिली चाचणी सुरू केली. मात्र, या चाचणीत त्यांना अपयश आल्याचं दिसून आलंय. प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच या जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली रॉकेटचा स्फोट (Starship Rocket Explodes) झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती. या रॉकेटमध्ये कोणताही सॅटेलाईट आणि आंतराळवीर नसल्याने मोठं नुकसान झालं नाही, असं म्हटलं जात आहे. या अपयशानंतर इलॉन मस्क (Elon Musk Reaction) यांची पहिली रिअॅक्शन समोर आली आहे.

स्पेसएक्स कंपनीचं हे रॉकेट जगातील सर्वात शक्तीशाली आणि सर्वात मोठं रॉकेट होतं. मेक्सिकोच्या सीमेजवळ टेक्सासच्या दक्षिण टोकापासून सुमारे 120 मीटर अंतरावर स्टारशिप रॉकेट लाँच करण्यात आलं होतं. लिफ्टऑफनंतर फक्त 4 मिनिटात पॅसिफिक समुद्रात (Starship Rocket Explodes Mission Failure) अंतराळयान क्रॅश झालं.

इलॉन मस्क आपल्या टीमसह प्रक्षेपण केंद्रावर बसले होते. ज्यावेळी त्यांना रॉकेट फेल गेल्याचं कळालं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गमावल्याचं काहीही दु:ख नव्हतं (Elon Musk Reaction After Starship Rocket Explodes). वैज्ञानिकांनी काही वेळाने रॉकेट फेल गेल्याचं जाहीर देखील केलं. त्यावेळी देखील त्यांच्या चेहऱ्यावर साधी मुद्रा दिसून (Elon Musk Reaction) आली. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे.

हेही वाचा :  एलॉन मस्क यांना तीन मोठे धक्के; 24 तासांत गमावली 'इतक्या' कोटींची संपत्ती

पाहा Video – 

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी प्रक्षेपणापूर्वी इशारा दिला होता की, उड्डानानंतर तांत्रिक समस्या संभाव्य आहेत. त्यामुळे मस्क यांना कोणतीही चिंता नव्हती का? असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. प्रक्षेपण अपयशी झाल्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विट करत टीमच्या कामाचं कौतूक केलं आणि पुढच्या महिन्यात पुन्हा प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.

आणखी वाचा – Elon Musk यांच्या मनात दडलंय काय, Twitter विकण्याची तयारी?

स्टारशिप रॉकेट म्हणजे काय? 

SpaceX या कंपनीचे हे रॉकेट आहे. स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी रॉकेट (Super Heavy Rocket) यांना एकत्रितपणे स्टारशिप असं नाव देण्यात आलंय. स्टारशिप हे एक पुन्हा वापरता येईल असं अंतराळयान आहे. जे पृथ्वीच्या कक्षेत, चंद्र, मंगळ आणि त्यापलीकडे क्रू आणि कार्गो दोन्ही वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …