Elon Musk आणि Mark Zuckerberg बंद पिंजऱ्यात भिडणार; तारीख ठरली पण एकच अडथळा

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: फेसबुकची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे खरोखरच केज फाइट म्हणजेच बंद पिंजऱ्यात एकमेकांविरोधात बॉक्सिंग मॅच खेळणार असल्याचं समजतं. या सामन्याची तारखेची माहितीही समोर आली आहे. झुकरबर्ग यांनी आपण याच माहिन्यात या लढाईसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र यामध्ये एक अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण मस्क यांच्या बाजूने आहे. याच महिन्यात लढू या मार्क यांच्या आव्हानाला मस्क यांनी सध्या शक्य नाही अशापद्धतीचा सूचक रिप्लाय दिला आहे. मस्क यांनी आपल्याला या फाइटआधी काही शस्त्रक्रिया कराव्या लागतील असं ट्वीटरवरुन जाहीर केलं आहे. दोघांनाही खरं तर जूनमध्ये एकमेकांना या फाइटसाठी आव्हान दिलं होतं. 

मस्क यांना करायची आहे शस्त्रक्रिया

मस्क यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन या फाइटच्या तारखेसंदर्भात बोलताना अद्याप तारीख निश्चित झालेली नाही असं म्हटलं आहे. आपल्याला कदाचित शस्त्रक्रिया करावा लागेल असं मस्क म्हणालेत. एमआरआय केल्यानंतर मान आणि पाठीची शस्त्रक्रिया करावी लागेल असं वाटत असल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे. मात्र या आठवड्यापर्यंत अंदाजित तारीख जाहीर करण्याची अपेक्षा आहे असंही मस्क यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, 'इथं' धुक्याची चादर

झुकरबर्ग तारखेसहीत तयार

दुसरीकडे मार्क झुकरबर्ग यांनी या फाइटसाठी तयारी जवळजवळ पूर्ण केली आहे. झुकरबर्ग तर या फाइटसाठी एवढे उत्साही आहेत की त्यांनी थेट तारखेची घोषणाच केली आहे. 26 ऑगस्ट रोजी ही फाइट होईल असं झुकरबर्ग म्हणालेत. मात्र मस्क यांनी याला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या फाइटचं भविष्य सध्या तरी अधांतरी आहे. झुकरबर्ग  यांनी ‘थ्रेड’वरुन, “मी आजही तयार आहे. त्याने जेव्हा मला पहिल्यांदा आव्हान दिलं होतं तेव्हा मी 26 ऑगस्टला लढूयात असं म्हटलं होतं. मात्र त्याने याला दुजोरा दिला नाही,” असं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मस्क यांनी जून महिन्यात ‘मेटा’चे सीईओ ट्वीटरप्रमाणे टेक्सवर आधारित नवीन ‘थ्रेड’ नावाची सेवा सुरु करणार असल्याच्या वृत्ताला ट्विटरवरुन खोचक पद्धतीने रिप्लाय केला होता. “मला विश्वास आहे की लवकरच संपूर्ण पृथ्वी झुकरबर्गच्या अंगठ्याखाली असेल आणि आपल्याकडे काहीच पर्याय उपलब्ध नसेल,” असा खोचक टोला मस्क यांनी लगावला होता. यावर एका युझरने मस्क यांना सावध राहा मार्कने जू-जीत्सू ही जपानी लढण्याची शैली शिकल्याचं सांगितलं होतं. त्यावर मस्क यांनी, “मी केज मॅचसाठी (पिंजऱ्यातील बॉक्सिंग मॅचसाठी) तयार आहे, अर्थात जर तो तयार असेल तर,” असा मेजशीर रिप्लाय केला होता. यावरच मार्क झुकरबर्ग यांनी हे आव्हान स्वीकारल्याचं सोशल मीडियावरुनच म्हटलं होतं.

हेही वाचा :  जो बायडेन यांच्या ‘या’ गोष्टीवर एलन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी; ट्विट करत दिले रोखठोक उत्तर

झुकरबर्ग यांनी मस्क यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला होता. या ट्वीटमध्ये मस्क यांनी आपण केज मॅच म्हणजेच बंद पिंजऱ्यामधील बॉक्सिंग मॅच खेळण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. हा स्क्रीनशॉट शेअर करत झुकरबर्ग यांनी ‘सेण्ड मी लोकेशन’ म्हणजेच ‘मला कुठे यायचं आहे ते सांग’ असं म्हटलं होतं. झुकरबर्ग यांच्या इन्स्ताग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. याच जुन्या संवादावरुन आता पुन्हा ही मॅच नेमकी कधी होणार याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. 

मार्क जू-जीत्सू शिकलेत

मार्क झुकरबर्ग यांनी कोरोना साथीच्या कालावधीमध्ये हौस म्हणून कराटेप्रमाणे जपानमध्ये खेळला जाणारा जू-जीत्सू हा सेल्फ डिफेन्सचा प्रकार शिकला. तो ब्राझीलमधील जू-जीत्सूच्या पहिल्या स्पर्धेमध्ये जिंकला होता. मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटर जू-जीत्सूचा सराव करत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आपण पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करत असल्याचं मार्क यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.

मस्क मार्शल आर्ट्सचे विद्यार्थी

विशेष म्हणजे मस्क हे सुद्धा मार्शल आर्ट शिकले आहेत. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मार्शल आर्टच्या सामन्यासाठी यापूर्वीच आव्हान दिलं होतं. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मार्च महिन्यामध्ये मस्क यांनी ट्वीटरवरुनच पुतिन यांनी एकच सामना होऊन जाऊ द्या आपल्यात असं म्हणत त्यांना आव्हान दिलं होतं. त्यावेळीही मस्क यांच्या या आव्हानाची चांगलीच चर्चा झाली होती.

हेही वाचा :  अनेकांची झोप उडवणाऱ्या Elon Musk च्या गाढ झोपेचं गुपित काय? पहिल्यांदाच Bedroom चा फोटो समोर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …