Eid 2023 : देशभरात रमजान ईदचा उत्साह; पंतप्रधान मोदी यांनी दिल्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा

Eid 2023 : आज देशभरात ईद (Eid) साजरी होत आहे. शनिवारी सकाळी मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली. यानंतर लोकांना एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी संध्याकाळी ईदचा चंद्र दिसल्यानंतर 24 मार्चपासून सुरू झालेला रमजान महिना पूर्ण झाला. ईद यशस्वीपणे पार पडण्यासाठी संपूर्ण देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ईदनिमित्त दिल्लीतील (Delhi) जामा मशीद, भोपाळची इदगाह आणि मुंबईतील (Mumbai_ माहीम दर्गा येथे सकाळपासूनच लोक नमाज पढण्यासाठी जमू लागले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सेलिब्रिटींनी शनिवारी ईद-उल-फित्रच्या निमित्ताने देशाला शुभेच्छा दिल्या आणि लोकांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. “ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा. आपल्या समाजात सौहार्द आणि करुणेच्या भावनेने पुढे जावो. मी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो. ईद मुबारक!,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पाटण्यातील गांधी मैदानावर पोहोचले होते. तर गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीतील संसद मार्गावरील मशिदीत ईदची नमाज अदा केली.

हेही वाचा :  Viral : 'ही तर सुपर मॉम'; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल

कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मुस्लिम बांधवांची भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी, आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नको आहेत. ज्यांना देश तोडायचा आहे, त्यांना मी ईदच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, मी जीव द्यायला तयार आहे, पण देशाची फाळणी होऊ देणार नाही, असे म्हटले आहे.

 

ईद-उल-फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना शेवया खाऊ घालतात. मुस्लिम धार्मिक मान्यतांनुसार, प्रेषित हजरत मुहम्मद यांनी 624 मध्ये बद्रची लढाई जिंकली होती. या आनंदात त्यांनी ईद-उल-फित्र साजरी करून लोकांचे तोंड गोड केले होते. त्यामुळे मुस्लिम या दिवशी गोड शेवया बनवून एकमेकांना खाऊ घालतात. जकात म्हणजेच ईदच्या निमित्ताने दानधर्म करणेही खूप महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  “तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात रमजान महिन्यासाठी अलविदा नमाज अदा करण्यात आली. याशिवाय ईदसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. शेवया, बांगड्या, कपडे आदी विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होती. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …