Delhi Murder: “आई-पप्पांनी मला बंद करुन ठेवलं आहे”, हत्येपूर्वी तरुणीने केलेलं शेवटचं चॅट आलं समोर, साहिलचाही उल्लेख

Delhi Murder Case: दिल्लीमध्ये (Delhi) तरुणीची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्यानतंर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. शाहबाद डेअरी परिसरात रविवारी 20 वर्षाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर (Minor Gil) चाकूने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. साहिलने तरुणीवर तब्बल 22 वेळा चाकूने वार केले आणि नंतर 4 वेळा डोक्यात दगड घातला. यादरम्यान तरुणीने केलेलं चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये साहिल आणि प्रवीण यांचा उल्लेख आहे. 6 एप्रिल ते 6 मे दरम्यान इन्स्टाग्रामवर (Instagrrm) हे चॅट करणयात आलं होतं. 

6 एप्रिलला साक्षीने इन्स्टाग्रामवर साहिलला ‘Hi’ असा मेसेज पाठवला होता. तसंच 14 एप्रिलला रात्री 2 वाजता प्रवीणने साक्षीला ‘Hi’ मेसेज पाठवला होता. मला मनातील काही गोष्ट सांगायची आहे असंही त्याने सोबत लिहिलं होतं. या मेसेजचा तरुणीने नितूला स्क्रीनशॉट पाठवला होता. 

यादरम्यान, नितू आणि पीडित तरुणीमधील संभाषण समोर आलं आहे. 6 मे रोजी नितूने मेसेज केला होता की, “साक्षी कुठे आहेस तू, माझ्याशी बोलणार नाहीस का?”. त्यावर तरुणी म्हणते की “यार, आई-बाबांनी मला बंद करुन ठेवलं आहे. फोन पण देत नाही आहेत. मी काय करु, पळून जाईन”. हत्येनंतर समोर आलेल्या चॅटनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तरुणी पळून जाण्याबद्दल का बोलत होती? तसंच नितू तिला माझ्या बोलणार नाहीस का? असं का विचारत होती याचा पोलीस शोध घेत आहेत. 

हेही वाचा :  साहिलच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावे, आरोपीने पोलिसांसमोर थेट नावेच घेतली

याआधी तरुणीने आपली मैत्रीण भावना आणि झबरु नावाच्या एका तरुणासह आरोपी साहिलला धमकावल्याचं समोर आलं आहे. यानंतर तरुणीने साहिलला फोन करुन ‘आता कुठे गेली तुझी गुंडगिरी’ असी विचारणा केली होती. तरुणीच्या हत्येनंतर तिची मैत्रीण भावनाने एक ऑडिओ शेअर केला आहे. यामध्ये तरुणी साहिलशी बोलताना ऐकू येत आहे. ऑडिओमध्ये तरुणीचा आवाज ऐकू येत आहे, ज्यामध्ये ती साहिलला म्हणत आहे की “मोठा गुंड आहेस का तू, कुठे गेली तुझी गुंडगिरी”.

सूत्रांच्या माहितीनुसार, 27 मे रोजी दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी तरुणी आणि साहिल यांच्यात व्हिडीओ कॉल झाला होता. हा कॉल बराच वेळ सुरु होता. यानंतर 28 मे रोजी म्हणजेच हत्येच्या दिवशी सकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी साहिल आणि तरुणी यांच्यात व्हिडीओ कॉलवरुन बोलणं झालं होतं 

पीडित तरुणीच्या वतीने झबरु याने साहिलला धमकावलं होतं. यानंतर तरुणी साहिलला कॉल करुन आणि ऑडिओ पाठवून खिल्ली उडवत होती. आरोपी साहिलने पोलिसांना तरुणीची झबरु नावाच्या तरुणाशी मैत्री झाल्याचं सांगितलं होतं. हत्येच्या एक दिवस आधी तरुणीने मैत्रीण भावना आणि झबरुसह साहिलची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. 

हेही वाचा :  Shraddha Murder Case: मेरा अबदुल ऐसा नही..., श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral

यादरम्यान, झबरुने साहिलला तरुणीपासून दूर राहायला सांगत धमकावलं होतं. यावरुन साहिल प्रचंड रागात होता. यामुळे त्याने तरुणीची हत्या करण्याची योजना आखली होती. पोलीस मात्र आरोपी साहिलने दिलेली सर्व माहिती पडताळून पाहत आहेत. मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

पोलिसांनी अटकेनंतर साहिलला सीसीटीव्ही फुटेज दाखवलं असता आपणच हत्या करणारा तरुण असल्याचं त्याने कबुल केलं आहे. यावेळी त्याने तरुणीला आपलं पूर्ण नाव साहिल खान असल्याची माहिती होती. आम्ही दोन ते तीन वर्षांपासून एकमेकाला ओळखत होतो. तसंच एकमेकांना इन्स्टावर फॉलो करत होतो असा दावा केला. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …