जेवण तर नाहीच दिलं अन् सामानही हरवलं; दीपक चाहरचा मलेशिया एअरलाइन्ससोबतचा धक्कादायक प्रवास

India Tour Of India: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज दीपक चाहरचाही (Deepak Chahar) संघात समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही तो भारतीय संघाचा भाग होता. यामुळं त्यानं न्यूझीलंडहून थेट बांगलादेश गाठलं. पण मलेशिया एअरलाइन्समधून (Malaysian Airlines) प्रवास करताना दीपक चाहरला बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करावा लागल्याचे त्यानं सांगितलंय. 

मलेशियन एअरलाइन्सनं न्यूझीलंडहून ढाका ‘बिझनेस क्लास’मध्ये प्रवास करूनही त्याचं सामान हरवलं आणि त्याला जेवणही दिलं गेलं नाही, असा दीपक चाहरनं दावा केलाय. “मलेशियन एअरलाइन्समध्ये प्रवास करण्याचा हा खूप वाईट अनुभव होता. आधी त्यांनी आमची फ्लाइट बदलली आणि आम्हाला त्याबद्दल माहितीही दिली नाही. त्यानंतर बिझनेस क्लासमध्ये जेवणही दिलं नाही. उद्या आम्हाला सामना खेळायचा असून आम्ही गेल्या 24 तासांपासून आमच्या सामानाची वाट पाहत आहोत”, अशा आशायाचं दीपक चाहरनं ट्विट केलंय. 

ट्वीट-

 

हेही वाचा :  फॉफ डू प्लेसिसचे डेव्हिड वार्नर आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर गंभीर आरोप

मलेशिया एअरलाइन्सकडून दिलगिरी व्यक्त
मलेशिया एअरलाइन्सनं चहरला तक्रार नोंदवण्यासाठी लिंक पाठवली. पण ती लिंक उघडत नसल्याचं दीपक चाहरचं म्हणणं आहे. मलेशिया एअरलाइन्सनं ट्विटरवर प्रतिक्रिया दिली, “हे ऑपरेशनल, हवामानशास्त्रीय आणि तांत्रिक कारणांमुळे होऊ शकते.” गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.” अनेक वेळा खेळाडूंना चुकलेल्या व्यवस्थापनामुळे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

मोहम्मद शामीऐवजी उमरान मलिकची संघात एन्ट्री
न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर दीपक चाहर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, शिखर धवन, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर हे क्राइस्टचर्चहून क्वालालंपूरमार्गे ढाका येथे पोहोचले. सूर्यकुमार यादव आणि उमरान मलिक यांनी थेट भारत गाठलं. पण दुखापतग्रस्त मोहम्मद शामीच्या जागी एकदिवसीय संघात समावेश करण्यात आल्यामुळं मलिकला आता बांगलादेशचा दौरा करावा लागणार आहे. 

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …