दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला!

Dadasaheb Phalke Award 2023 : ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) हा सिनेविश्वातील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या सिनेमातील भूमिकेसाठी तसेच सिनेविश्वातील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) सिनेमातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 

आलिया भट्टने ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळ्यात हजेरी लावली होती. रणबीर कपूर आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर असल्याने तो या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नव्हता. त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला. 

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला!

आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमात तिने सेक्स वर्कर-माफिया डॉनची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. जगभरात तिची ही भूमिका प्रचंड गाजली. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित हा सिनेमा 2022 मध्ये सुपरहिट ठरला. त्यामुळे या सिनेमातील भूमिकेसाठी आलियाला दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे अर्यान मुखर्जी (Ayan Mukherji) दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात रणबीरने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. त्यामुळेच त्याला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. एकंदरीतच या पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. 

हेही वाचा :  Dipali Sayyed : अभिनेत्री दीपाली सय्यदचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि आलियाच्या फोटोंनी मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुरस्कार सोहळ्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानदेखील आलियाने पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. तर पुरस्कार सोहळ्यात रेखाने सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. 

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात ‘या’ सेलिब्रिटींची हजेरी

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कांतारा फेम ऋषभ शेट्टीचा डंका; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कार जाहीर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …