Covid-19: देशात पुन्हा पसरतोय कोरोना; गेल्या 24 तासांत दोन रूग्णांच्या मृत्यूची नोंद

Covid-19: देशात पुन्हा एकदा कोरोना हात-पाय पसरू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालायने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या एकूण 760 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये कोरोनानुळे 2 रूग्णांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. 

एक्टिव्ह रूग्णसंख्येत झाली वाढ 

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, नव्या प्रकरणं समोर आल्याने देशातील एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 4,423 वर जाऊन पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट

कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होताना दिसतेय. कोरोनाच्या नवी सब-व्हेरिएंट JN.1 च्या आतापर्यंत 541 प्रकरणांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 5 डिसेंबरपर्यंत, दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती, कोरोनाचे नवीन सब व्हेरिएंट सापडल्यानंतर, त्याची प्रकरणे वेगाने वाढताना दिसतायत.

नवीन कोविड सब-व्हेरियंट JN.1 पासून संरक्षण करण्यासाठी, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी आणि वृद्धांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळालं पाहिजे. याशिवाय घराबाहेर पडताना मास्क वापरावा, असं टास्क फोर्सने म्हटलं आहे. सार्वजनिक ठिकाणी या नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज नसली तरी, सुरक्षिततेची खबरदारी घेतली पाहिजे. 

हेही वाचा :  लवकर परत येईन म्हणणारी प्रिया परत आलीच नाही; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवा फुटबॉलपटूचा मृत्यू

कोरोनाची वाढती लोकसंख्या पाहता कोविड टास्क फोर्सने सकारात्मक अहवाल असलेल्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी करणाऱ्या लोकांनी पाच दिवसांसाठी सेल्फ-आयसोलेशन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून…; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलं

उत्तर प्रदेशात पत्नीने पतीवर अमानवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचे हात पाय …

‘…तर लोकांचा विश्वास उडून जाईल,’ सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, ‘कसं काय तोंड द्यायचं?’

राज्य शालेय सेवा आयोगाच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेववरील सुनावणीदरम्यान …