देशातील बेस्ट सेलिंग बाईक नव्या अवतारात लाँच! जबरदस्त फिचर्स आणि 73KM चा मायलेज

देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने घरगुती बाजारपेठेत आपली प्रसिद्ध कम्प्युटर बाईक Hero Splendor XTEC ला नव्या अवतारात लाँच केलं आहे. कंपनीने या बाईकला Splendor+ XTEC 2.0 नाव दिलं आहे. यामध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स देण्यात आले आहेत, जे मागील मॉडेलच्या तुलनेत तिला जास्त चांगली बनवतात. नव्या Splendor+ XTEC 2.0  ची किंमत 82 हजार 911 रुपये (एक्स शोरुम) ठरवण्यात आली आहे. 

नव्या स्प्लेंडरमध्ये खास काय आहे?

लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये आधीप्रमाणे क्लॉसिक डिझाईन देण्यात आलं आहे. यामध्ये नव्या LED हेडलाईटसह हाय इंटेसिटी पोझिशन लँपचा (HIPL) समावेश कऱण्यात आला आहे. यात युनिक ‘H’ शेपमधील टेल लँप देण्यात आला आहे जो रात्रीच्या वेळी रोड प्रेजेंसला अधिक चांगलं बनवतं. याशिवाय पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, मोठी सीट, ग्लॉव बॉक्स आणि युसबी चार्जिंग पोर्ट त्याला अधिक दर्जेदार बनवतात.

इंजिन आणि परफॉर्मन्स

कंपनीने नव्या Hero Splendor+ XTEC 2.0 मध्ये आधीप्रमाणे 100 सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजिन दिलं आहे. हे इंजिन 7.9 बीएचपीची पॉवर आणि 8.05 चा टॉर्क जनरेट करतं. इंजिन आयडियल स्टार्ट/स्टॉक सिस्टमयुक्त (i3S) आहे. यामुळे बाईकचा मायलेज वाढण्यास मदत मिळते. कंपनीचा दावा आहे की, या बाईकची रनिंक कॉस्ट कमी असण्यासह तिचा मेंटेनन्सही कमी आहे. ही बाईक प्रतिलीटर 73 किमीचा मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. या बाईकची वॉरंटी 5 वर्षं किंवा 70 हजार किमी आहे. 

हेही वाचा :  Harley Davidson चं हायटेक इलेक्ट्रीक मॉडेल भारतात; 3.5 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग

फिचर्स काय आहेत?

या बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. ज्यामध्ये इकोनॉमी इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर, साईड स्टँड इंडिकेटर, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी अशा सुविधा मिळतात. तुम्ही आपला स्मार्टफोन या बाईकशी कनेक्ट करु शकता. जेणेकरुन तुम्हाला बाईक चालवताना मेसेज, कॉल आणि बॅटरी अलर्ट मिळत राहिली. 

सुरक्षेसाठी बाईकमध्ये हजार्ड लाइट विंकर्स, साईड स्टँड इंजिन कट ऑफ देण्यात आलं आहे. नवी हेडलाईट रात्रीच्या वेळी जास्त चांगली दृश्यमानता देईल असा कंपनीचा दावा आहे. ही बाईक ड्युअल टोन पेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यात मैटे ग्रे, ग्लॉस ब्लॅक आणि ग्लॉस रेड आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

CEAT वर्धन टायर्स: वाहतूक आणि शेतीमध्ये सर्वात आघाडीवर

टायर्सच्या जगात, CEAT हा शब्द विश्वास आणि विश्वासार्हतेचा समानार्थी आहे. नेहमीच नावीन्यपूर्ण आणि गुणवत्ते साठी …

ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण

iPhone Black Dark: आयफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. काहीजण टिकाऊ म्हणून आयफोन वापरतात तर …