Cooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा …

Cooking Tips : इडली खाणारे आपल्याकडे बरेच जण आहेत. सकाळच्या नाश्त्याला वाफाळता इडली खाणं म्हणजे सूख…बरं त्यात इडली म्हणजे पौष्टिक पदार्थ. तेल आणि मसाले न न वापरता इडली करणं म्हणजे सकाळी सकाळी शरीराला कोणत्याही मसाल्यांमुळे तेलामुळे होणारी हानी नाही. एकूणच आरोग्याच्या दृष्टीने इडली म्हणजे उत्तम ब्रेकफास्ट. (how to make perfect spongy idali at home)

पण बऱ्याचदा घरी इडली बनवताना ती नीट साधत नाही. मऊ आणि लुसलुशीत होत नाही.  सगळं प्रमाण व्यवस्थित असूनही नेमकं काय चुकतं हे आपल्याला कळत नाही. पण आता याची काळजी करू नका. मऊ आणि लुसलुशीत इडली घरच्या घरी बनवायची असेल तर काय करायला हवं यापेक्षा काय चुका टाळायला हव्या हे एकदा जाणून घ्या. (How To Make  Spongy Idli Recipe)

जर तुम्ही रवा इडली बनवणार असाल तर नेहमी लक्षात ठेवा, इडलीचा घेतला जाणारा रवा व्यवस्थित भाजून घ्यायला हवा.  रवा चांगला भाजून आंबवला कि, इडल्या छान फुगतात आणि मऊ राहतात.  अशी जाळीदार इडली  (cooking tips in marathi) चटणी नसेल आणि गरमागरम खाल्ली तरी उत्तम लागते. 

हेही वाचा :  'माझा मुलगाच सचिनला संपवेल'; सीमा हैरदरच्या पाकिस्तानातील पतीची थेट धमकी

एका भांड्यात 1 वाटी उडीद डाळ घ्या ती 2-3 तास चांगली भिजवा. दुसरीकडे इडलीसाठीचा तांदूळ भिजवत ठेवा. लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या भिजवा, एरव्ही आपण त्या एकत्र भिजवतो आणि गल्लत होते. 

2  उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, एकत्र बारीक करू नका. 

3  आता बारीक केलेली ही मिश्रण एका मोठ्या भांड्यात एकत्र करून घ्या. हाताने छान (cooking tips ) एकजीव करा अश्याने आंबण्याची प्रक्रिया चांगली होते. 

4 इडलीसाठी पीठ भीजवणार असाल तर ते ,रात्रभर किमान आठ तास तरी भिजायला हवा. आपण बऱ्याचदा घाई घाईत ३-४ तास भिजवतो मग ते वापरतो, पण अश्याने पीठ नीट आंबट नाही आणि त्यापासून बनलेल्या इडली फुगतसुद्धा नाहीत. 

(video credit : Hebbar’s Kitchen)

5 एकदा का पीठ बनवून झालं, व्यवस्थित आंबून फुगलं कि, जास्त हलवू नये. फुगल्यानतंर त्यात मीठ घालून त्याचे डोसे किंवा इडली करावी.   (how to make south indian style perfect soft spongy idli at home with this cooking tips in marathi )
या टिप्स नक्की ट्रायकरून पाहा, इतरांना देखील सांगायला विसरू नका.  आणि बना स्मार्ट गृहिणी. (smart kitchen tips)

हेही वाचा :  Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …