संगीतकार निर्मल मुखर्जी’ यांचे निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nirmal Mukherjee : वाद्यवादक (Instrumentalist) आणि संगीतकार (Musician) निर्मल मुखर्जी (Nirmal Mukherjee) यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी मुंबईत (Mumbai) अखेरचा श्वास घेतला. बोंगो (Bongo Drum), कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे अशा सर्वच पाश्चिमात्य वाद्यांवर त्यांची हुकुमत होती. हिंदी, बंगाली भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतंच पण ते मराठी आणि विशेषतः मालवणी भाषेत गप्पा मारत असत. “अशी चिकमोत्याची माळ” (Ashi Chik Motyachi Maal) हे अप्रतिम गणेशगीत त्यांनी अरविंद हळदीपूर (Nityanand Haldipur) यांच्यासोबतीने संगीतबद्ध केलं.  

निर्मल मुखर्जी यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. निर्मल यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा आणि दोन मुली असं कुटुंब आहे. मुंबईतील साकीनाका (Saki Naka) येथे असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

वाद्य संयोजक म्हणून अनेक गाण्यात योगदान

निर्मल मुखर्जी हे अरविंदजी हळदीपूर यांच्यासह “अरविंद-निर्मल” (Arvind Nirmal) या नावाने संगीत देत असत. ‘झाले मोकळे आकाश’ या चित्रपटालाही या जोडीने संगीत दिले होते. संगीतकार राजेश रोशनजींच्या टीममध्ये ते नेहमीच असत. वाद्य संयोजक म्हणून अनेक गाण्यात त्यांचं योगदान आहे.

हेही वाचा :  RRR : सिनेप्रेमींसाठी खुशखबर, एसएस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 3D मध्ये रिलीज होणार!

news reels New Reels

लक्ष्मीकांत-प्यारेलाल (Laxmikant–Pyarelal), पंचमदा (R. D. Burman), राजेश रोशन (Rajesh Roshan), कल्याणजी-आनंदजी तसेच (Kalyanji–Anandji) अनू मलिक (Anu Malik), जतिन-ललित (Jatin-Lalit) ते थेट विशाल-शेखर (Vishal–Shekhar) या संगीतकारांच्या गीतांमध्ये त्यांनी बोंगो, कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे अशा वाद्यांचे वादन केलं. 

वयाच्या दहाव्या वर्षी संगीत क्षेत्रात पाऊल

निर्मल यांनी दहाव्या वर्षी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं. मुंबईमधील दादर (Dadar) येथे त्यांचा म्युझिक हॉल होता. निर्मल यांना विविध वाद्ये शिकण्याची आवड होती. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, गायिका आशा भोसले यांच्या एका शोसाठी ते दुबईमध्ये गेले होते. त्याठिकाणी तेथे असणाऱ्या लेबानिझ नर्तिका आणि वादकांकडे त्यांनी दरबुका हे वाद्य पाहिलं. त्यानंतर निर्मल मुखर्जी यांनी त्या वाद्याचं निरीक्षण केलं. त्यांनतर ते त्यामध्ये पारंगत झाले होते. 

महराष्ट्र राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मान

निर्मल मुखर्जी यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या ‘एक होती वादी’ या चित्रपटासाठी बरेच पुरस्कार मिळाले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 19 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …