Chandrayaan-3 चंद्रावर उतरल्याचं पाहताच मोदींनी पुढल्या क्षणी कोणाला केला फोन? पाहा Video

PM Modi Phone Call Chandrayaan-3 Success: 23 ऑगस्ट 2023 ही तारीख जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. भारताने याच तारखेला ऐतिहासिक कामगिरी करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाला जमली नाही अशी कामगिरी भारताने करुन दाखवली आहे. बुधवारी चांद्रयान-3 मोहिमेतील लँडर यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभगावर उतरल्यानंतर देशभरात अगदी दिवाळी साजरी करण्यात आली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही इतका उत्साह दिसून आला. 

यशस्वी लँडिंगनंतर मोदींचा फोन कॉल

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं विक्रम लँडर नियोजित ठिकाणी उतरलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘ब्रिक्स’ देशांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून तिथूनच ते या मोहिमेच्या लँडिंगनंतर सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली. पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेवरुन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने इस्रोच्या वैज्ञानिकांबरोबर हे लँडिंग पाहिलं. त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं आणि सर्व भारतीयांचं या यशस्वी लँडिंगनंतर अभिनंदन केलं. दरम्यान चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्रावर उतरल्याचं पाहिल्यानंतर मोदींनी मोबाईल हातात घेतला आणि थेट एक फोन लावला.

हेही वाचा :  भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

नक्की पाहा हे फोटो >> Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! ‘या’ 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos

कोणाला केला होता कॉल?

पंतप्रधान मोदींनी चांद्रयानातील लँडर चंद्रावर उतरल्यानंतर हा फोन कोणाला लावला होता असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ. मोदींनी एस. सोमनाथ यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी एस. सोमनाथ आणि त्यांच्या टीमला फोनवरुन शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी या संपूर्ण टीमचं तोंडभरुन कौतुक केलं आणि भारतीयांचे आभार मानले.

नक्की पाहा >> “पाकिस्तानी जनता चंद्रावर राहते! चंद्रावर गॅस, पाणी, वीज नाही इथंही नाही”; उडवली स्वत:चीच खिल्ली

काय म्हणाले मोदी?

“सोमनाथजी तुमचं नावच सोमनाथ असून हे नावही चंद्राशी संबंधित आहे. त्यामुळे तुमचे कुटुंबियही फारच आनंदी असतील. माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्याकडून सर्वांना अभिनंदन सांगा. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी प्रत्यक्षात भेटून तुम्हाला शुभेच्छा देईन,” असं पंतप्रधान मोदींनी एस. सोमनाथ यांना फोनवर सांगितलं.

दरम्यान, चांद्रयान-3 चं लँडर चंद्रावर उतरल्यानंतर इस्रोच्या मुख्यालयामध्ये वैज्ञानिक आणि संशोधकांनी एकच जल्लोष केला.

केवळ चौथा देश

इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत विक्रम लँडर भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर टचडाऊन झालं आणि भारतासहीत जगभरामध्ये एकच जल्लोष झाला. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. एकंदरित चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला असून केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच ही कामगिरी करता आली आहे. आता या यादीत भारताचाही समावेश झाला असून जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

हेही वाचा :  विश्लेषण : बेदाणा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर; तरीही काय आहेत आव्हाने?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …