पार पडलं सिद्धार्थ- कियाराचं ग्रँड रिसेप्शन

Alia Bhatt In Sid Kiara Reception: बॉलिवूडमधील अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)  यांचा विवाह सोहळा 7 फेब्रुवारी रोजी पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  सिद्धार्थ आणि कियारा यांचे नुकतेच ग्रँड रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

रिसेप्शनसाठी कियारा आणि सिद्धार्थनं केला खास लूक

कियारा आणि सिद्धार्थनं रिसेप्शनसाठी खास लूक केला होता. कियारानं ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस, स्टोनची ज्वेलरी असा लूक केला होता. तर सिद्धार्थनं ऑल ब्लँक लूक केला होता.


‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

अभिनेते अनुपम खेर, अभिषेक बच्चन, काजोल आणि अजय देवगन, ईशान खट्टर,  फोटोग्राफर डब्बू रतनानी, नीतू कपूर, करीना कपूर करण जोहर, ओम राऊत, पूनम ढिल्लन, कोरिओग्राफर गणेश हेगडे यांनी सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ग्रँड रिसेप्शनला हजेरी लावली.

फॅशन डिझायनर अनाहिता श्रॉफ, मनीष मल्होत्रा, भूल भुलैया 2 चे दिग्दर्शक अनीस बज्मी आणि प्रसिद्ध उद्योजक अदर पूनावाला, पुनीत मल्होत्रा यांनी देखील सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. तसेच अभिनेत्री आलिया भट्ट देखील या रिसेप्शला उपस्थित होती. यावेळी आलियानं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. 


विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियंका ओबेरॉय यांनी देखील कियारा आणि सिद्धार्थ यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. 

हेही वाचा :  न्यूड फोटोशूटमुळे 'हे' कलाकार आले चर्चेत!

सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले. सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम ‘पिंक अँड व्हाईट’ अशी होती. वर पक्षातील पाहुण्यांनी व्हाईट तर वधू पक्षातील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते. 

सिद्धार्थ आणि कियाराचे चित्रपट

सिद्धार्थचा ‘मिशन मजनू’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थचा ‘योद्धा’ हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या दोघांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यातील पहिली झलक अखेर समोर; व्हिडीओ पाहिलात का?Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …