Chandramukhi : ‘चंद्रमुखी’ सिनेमातल्या तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आहे ‘ही’ अभिनेत्री

Chandramukhi : बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात चंद्रा हे पात्र कोण साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण अखेर आज ‘चंद्रमुखी’चा चेहरा समोर आला आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमात चंद्रा हे पात्र अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar) साकारणार आहे. 

‘चंद्रमुखी’ सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या ‘चंद्रा’ची प्रेमकहाणी आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय प्रेमकहाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.




‘चंद्रमुखी’ हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. सिनेमाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय – अतुल या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे. अमृता प्रेक्षकांना ढोलकीच्या तालावर, घुंगरांच्या बोलावर, साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी घायाळ करणार आहे. 

हेही वाचा :  Mohandas Sukhtankar : मोहनदास सुखटणकर यांनी गाजवली मराठी रंगभूमी

संबंधित बातम्या

Kangana Ranaut : कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं दिला नकार

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर ‘गोदावरी’ आता न्यूयॅार्कमध्ये झळकणार!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …