ताज्या

उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी ९४ हजार विद्यार्थी

ठाणे : उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत असून ठाणे जिल्ह्यातून एकूण ९४ हजार ९४१ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले आहेत. करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. या वर्षी विद्यार्थ्यांच्या लेखी स्वरूपात परीक्षा होणार असून ठाणे जिल्ह्यात एकूण ४१९ केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून …

Read More »

भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवले?; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले सत्य

युक्रेन आणि रशिया यांच्यात आठव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. अनेक भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. बुधवारी, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दोन सूचना जारी केल्या होत्या, ज्यात भारतीयांना खार्किव सोडण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना खार्किव्ह सोडण्यासाठी रशियाने युद्ध सहा तासांसाठी थांबवल्याच्या वृत्ताचे खंडन केले. खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने सहा …

Read More »

विश्लेषण : मनमोहन सिंग यांच्यापासून ते मोदींपर्यंत; पुतीन यांच्या युद्धात भारत तटस्थ का आहे?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासभेत युक्रेन-रशिया मुद्द्यावर भारत तटस्थ राहिला आहे. भारताच्या या पावलावर अनेक तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत, तर अनेकांना भारताची ही वृत्ती योग्य असल्याचे वाटत आहे. पण रशियाबाबत भारताची भूमिका पाहिली तर त्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फारसा काही बदल झालेला दिसत नाही. २०१४ मध्ये, जेव्हा व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले आणि क्रिमियावर ताबा मिळवला, …

Read More »

पोहे आहेत एक आरोग्यदायी नाश्ता; याचे ‘हे’ पाच फायदे तुम्हालाही नसतील माहित

महाराष्ट्रात पोहे हा सर्वांचाच आवडता नाश्ता आहे. लग्न ठरवताना देखील कांदे-पोह्यांचा कार्यक्रम केला जातो. चवीसोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने आपण तंदुरुस्त तर होतोच, सोबतच वजन कमी करण्यासही हे उपयुक्त आहेत. यामध्ये कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात आढळते आणि त्यात शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे देखील असतात. सकाळच्या वेळी लोकांना पोहे खायला आवडते कारण ते सहज पचतात. जाणून घेऊया पोह्यांचे सेवन …

Read More »

विश्लेषण : रशियन ‘युद्धकथन’ वि. बड्या ‘टेक’ कंपन्या; काय आहे हा खेळ?

सुनील कांबळी सैन्य प्रत्यक्षात रणांगणात उतरण्याआधी माहितीयुद्ध सुरू होते. त्यासाठी हेतुपूर्वक युद्धकथन रचावे आणि प्रसारित करावे लागते. रशियाने तेच करण्याचा प्रयत्न केला. त्यास आवर घालताना माहिती- तंत्रज्ञान कंपन्यांची कसोटी लागली आहे. ती कशी, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. रशियन युद्धकथन काय? आठ वर्षांपूर्वी क्रिमियाचा घास घेतल्यापासूनच विस्तारवादी रशियाने युक्रेनभूमी भुसभुशीत करून ठेवली होती. गेल्या वर्षापासून रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य …

Read More »

रात्रीची नखे कापणे का मानले जाते अशुभ? यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण

काळाच्या ओघात लोकांनी रात्रीची नखे न कापण्याच्या गोष्टीला अंधश्रद्धेशी जोडले. काही लोक अजूनही त्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या मुलांनाही ते पाळण्यास सांगतात. रात्रीची नखे का कापू नयेत? हा तो प्रश्न आहे जो आजवर अनेकांना पडला असेल. प्रत्येक घरातील वडीलधारी मंडळी रात्रीची नखे कापण्यापासून अडवतात, परंतु खूप कमी वेळा असे न करण्यामागचे योग्य कारण सांगितले जाते. यामुळे आज आपण फक्त या …

Read More »

सोलापूर: एनटीपीसीने चार ग्रामपंचायतींचा ५० कोटींचा कर थकविल्याने वाद

सोलापूरजवळ औष्णिक प्रकल्प चालविणाऱ्या एनटीपीसीने स्थानिक चार ग्रामपंचायतींचा सुमारे ५० कोटींचा कर थकविला आहे. मात्र एनटीपीसीने स्वतःला केंद्र सरकारचा घटक असल्याचे सांगत ग्रामपंचायतीचा कर भरण्यास नकार दिल्यामुळे हा वाद सध्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीपुढे सुनावणीसाठी आला आहे. सोलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी, आहेरवाडी, तिल्हेहाळ आणि होटगी स्टेशन या चार ग्रामपंचायतींच्या हद्दीत एनटीपीसीने २००८ साली १३२० मेगावाट क्षमतेचा …

Read More »

आधीपासून शिक्षणाबाबत धोरण योग्य असते तर..; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांचे युक्रेनचे अनुभव सांगितले. पंतप्रधानांना भेटलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या संसदीय मतदारसंघातील वाराणसीचे लोकही होते. याशिवाय उत्तर प्रदेशातील इतर भागातील विद्यार्थ्यांशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी अगदी …

Read More »

“मुंबई महापालिकेत आदित्य सेनेने भ्रष्टाचाराचा…”: भाजपा आमदाराचे गंभीर आरोप

मुंबई महानगर पालिकेत आदित्य सेनेने जणू काही भ्रष्टाचाराचा वर्ल्ड रेकॅार्ड करायचे ठरवले आहे, असा आरोप भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. त्यांनी सुधार समितीच्या बैठकीत प्रकल्पबाधितांसाठी आणलेल्या एका प्रस्तावावरून टीका केली आहे. त्या प्रस्तावात तीनशे चौरस फुटाची सदनिका ही तब्बल एक कोटी सत्तावन लाख रूपये किमतीची आहे. म्हणजेच ५२ हजार प्रति चौरसफुट या दराने ५२९ सदनिका घ्यायचे पालिकेने ठरवले …

Read More »

ईडी कोर्टात रकमेचा आकडा देताना चुकतेच कशी?; नवाब मलिकांवरील आरोपांवरुन राष्ट्रवादी आक्रमक

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर पुन्हा सुनावणीनंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड …

Read More »

बहिणीला रुग्णवाहिकेतून जाताना पाहताच घोड्याने केला पाठलाग Viral Video, पाहून तुम्हीही व्हाल भावूक

माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि त्यांना देखील आपल्या कुटुंबापासून लांब जाणं खूप असतं. आपल्या कुटुंबात जर कोणी आजारी असेल तर आपण त्याची काळजी घेतो. त्याला रुग्णालयात घेऊन जातो. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक घोडा रुग्णालयाच्या पाठी धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ उदयपुरमधील आहे. व्हिडीओत असलेला घोडा त्याच्या आजारी …

Read More »

मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना अडीच कोटींचा गंडा, पोलिसांकडून एकाला अटक!

ठाण्यात गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून एका व्यक्तीने ३७ गुंतवणूकदारांना फसवलं आहे. भागभांडवली बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे अमिष दाखवून ३७ गुंतवणूकदारांची अडीच कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तुषार साळुंखे (३५) याला अटक केली आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात …

Read More »

Hijab Ban: कोर्टात हिजाब घालण्यास वकिलांना बंदी; फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मागील अनेक दिवसांपासून देशात हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजतोय. कर्नाटक सरकारने शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्यास बंदी घातल्यानंतर हा वाद निर्माण झाला. कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर वेगवेगळ्या स्तरावरुन विविध प्रतिक्रिया उमटल्या. तर दुसरीकडे आता फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयानेदेखील हिजाब परिधान करण्यावबाबत मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्याचा निर्णय फ्रान्समधील सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. फ्रान्समध्ये एप्रिल …

Read More »

Toyota Glanza 2022 चा कंपनीने जारी केला टीझर, जाणून घ्या फिचर्स आणि डिझाईन

टोयोटा मोटर्स आपली लोकप्रिय हॅचबॅक टोयोटा ग्लान्झा भारतात नवीन फिचर्स आणि डिझाइनसह लाँच करणार आहे. टोयोटा कंपनीने ग्लान्झा या कारचा टीझर जारी केला आहे. यातून कारचे डिझाईन आणि इंटीरियर याची माहिती मिळते. कंपनीने या कारला नवीन टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिले आहे. यात व्हॉईस असिस्टन्ससह नवीन डिझाईन आहे. याशिवाय, कंपनीने या कारचा एसी देखील बदलला आहे, तर एसी व्हेंट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट …

Read More »

Viral: भरधाव गाडी चालवताना पकडलं; चालकानं खापर फोडलं पुतिन आणि अणुयुद्धावर

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील एका व्यक्तीला पोलिसांनी वेगात गाडी चालवल्याप्रकरणी पकडल्यानंतर त्याने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर आरोप केले. एका पोलिस अधिकार्‍याशी वाद घालणार्‍या अज्ञात व्यक्तीचे बॉडीकॅम फुटेज मंगळवारी फ्लॅगलर काउंटी शेरीफ ऑफिस फेसबुक पेजवर पोस्ट केले गेले. हा व्हिडीओ २४ फेब्रुवारी २०२२ चा होता. त्याच दिवशी पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिला होता. रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हरने स्टॉप साइन असतानाही गाडी …

Read More »

Ukraine War: ‘आम्ही करून दाखवलं!’ रशियन लष्कराचे टँक घेऊन हाय-स्पीड राइडवर गेले युक्रेनियन, Video Viral

हे लोक टँकवर बसून जल्लोष करताना दिसत आहेत. मागच्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धाचे अनेक हादरवून टाकणारे व्हिडीओ आपण पाहत आहोत. अनेक ठिकाणी रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनच्या निशस्त्र नागरिक त्यांना भिडताना दिसताहेत. काही जणांनी तर रशियन लष्कराला रोखण्यासाठी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. युक्रेनमधून सतत हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या आणि व्हिडीओ येत आहेत. …

Read More »

नवी मुंबई : पैशाच्या वादातून पाठीत स्क्रू डायव्हर खुपसून ठेकेदाराची हत्या; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

उसणे पैशांच्या वादातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केल्याची घटना नवी मुंबईमध्ये ढली असून या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीने मयत व्यक्तीस ३० हजार रुपये दिले होते. मात्र अनेकदा तगादा लावूनही पैसे देत नसल्याच्या रागातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केली आहे.  जयशंकर प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. शिरवणे एमआयडीसीमधील शिशा साई प्रिंटिंग प्रेसमध्ये आरोपी आणि ठेकेदार दोघे कामाला होते. ठेकेदार नंदकिशोर सहानी …

Read More »

युक्रेनियन्ससाठी पायघड्या, नी आम्ही दहा वर्षांनीही तंबूतच; युरोपच्या वागण्यावर सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर लाखो लोक सुरक्षित स्थळांच्या शोधात शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेत आहेत. यामध्ये पोलंड, हंगेरी, बल्गेरिया, मोल्दोव्हा आणि रोमानियासारख्या देशांच्या नेत्यांनी युक्रेनियन नागरिकांचे स्वागत केले आहे. पण दुसरीकडे २०१५ मध्ये अशीच परिस्थिती उद्धभवलेली असताना पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतून, विशेषत: सीरियामधून स्थलांतरितांना अशी वागणूक दिली गेली नव्हती. युरोपीय नेत्यांनी या स्थलांतरितांना विरोध दर्शवला होता. युरोपियन देशांनी एका आठवड्यापेक्षा कमी …

Read More »

Ind Vs Pak: रोहित, विराटचं महिला संघाला प्रोत्साहन, रविवारी होणार सामना

विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत रविवारी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि सलामीवीर पृथ्वी शॉ यंनी महिला संघाला प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वचषक २०२२ स्पर्धेदरम्यान भारतीय महिला संघाला पाठिंबा देण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. महिलांचा एकदिवसीय विश्वचषक ४ मार्चपासून सुरु होणार असून पहिला सामना …

Read More »

जो बायडेन यांच्या ‘या’ गोष्टीवर एलन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी; ट्विट करत दिले रोखठोक उत्तर

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी जो बायडेन यांच्याबद्दल अनेकदा आक्रमक टिप्पण्या केल्या आहेत. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर निशाणा साधला आहे. बायडेन यांनी नुकतेच अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना वाहन कंपन्यांचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले की, ‘फोर्ड (Ford) आणि जनरल …

Read More »