नवी मुंबई : पैशाच्या वादातून पाठीत स्क्रू डायव्हर खुपसून ठेकेदाराची हत्या; घटनाक्रम CCTV मध्ये कैद


उसणे पैशांच्या वादातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केल्याची घटना नवी मुंबईमध्ये ढली असून या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीने मयत व्यक्तीस ३० हजार रुपये दिले होते. मात्र अनेकदा तगादा लावूनही पैसे देत नसल्याच्या रागातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केली आहे. 

जयशंकर प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. शिरवणे एमआयडीसीमधील शिशा साई प्रिंटिंग प्रेसमध्ये आरोपी आणि ठेकेदार दोघे कामाला होते. ठेकेदार नंदकिशोर सहानी सोबत पैशांच्या व्यवहारामधून झालेल्या वादामध्ये जयशंकरने नंदकिशोरची हत्या केली. पाठीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून नंदकिशोरची हत्या करण्यात आली.

साधारण वर्षभरापूर्वी दोघेही एका अन्य कंपनीत कामाला असताना मयत व्यक्तीने आरोपीकडून ३० हजार रुपये उसणे घेतले होते, मात्र पैसे परत न दिल्याचे रागातून जयशंकरने ठेकेदार नंदकुमार सहानीच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून हत्या केली. या हल्ल्यामध्ये नंदकिशोरचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व हल्ल्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली 

हेही वाचा :  प्रेम नको, सर्वांना फक्त SEX हवा होता, मग पैसे घेऊन का नको? 26 वर्षांचा जेरी बनला ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर

The post नवी मुंबई : पैशाच्या वादातून पाठीत स्क्रू डायव्हर खुपसून ठेकेदाराची हत्या; घटनाक्रम CCTV मध्ये कैद appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …