ताज्या

Russia Ukraine War Live: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आज अमेरिकन सिनेटर्सशी बोलणार

Ukraine Russia Crisis Live: रशिया-युक्रेन युद्धातील ताज्या घडामोडी.. Russia Ukraine Crisis Live: रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षांनंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला. आगीमुळे मोठय़ा आण्विक दुर्घटनेच्या धोक्याने जगभर भीतीची लाट पसरली होती. परंतु ही इमारत या प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र …

Read More »

Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या आजचे दर

सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. भारतीय सराफा बाजारात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,७०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६८,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति …

Read More »

पंढरपूर : “पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको, कारण…” असं म्हणत २६ वर्षीय शेतकऱ्याची FB Live वर आत्महत्या

त्याने या व्हिडीओमध्ये कीटकनाशकाची बाटली दाताने उघडली आणि तोंडाला लावली. सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. फेसबुक लाइव्ह सुरु असताना एका शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या केलीय. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी पंढरपूरमधील मगरवाडीमधील सूरज जाधव नावाच्या शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. शुक्रवारी सायंकाळी सूरजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २६ वर्षीय सूरजचा कीटकनाशक पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या …

Read More »

विश्लेषण : सबकुछ नवीनबाबू! ओडिशात बिजू जनता दलाने सर्व जिल्हा परिषदा कशा जिंकल्या?

सर्व ३० जिल्हा परिषदांमध्ये बिजू जनता दलाची सत्ता आली आहे. ८५३ जागांपैकी ७६५ जागा या पक्षाने जिंकल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत ६० टक्के अधिक जागा त्यांनी पटकावल्या. – हृषिकेश देशपांडे सत्ताधारी पक्षाला कोणत्याही निवडणुकीत काही प्रमाणात मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागतो. कारण जनतेच्या सर्वच अपेक्षा पूर्ण करणे शक्य नसते. ओडिशात मात्र चित्र उलटे आहे. या राज्यात प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताधारी बिजू …

Read More »

विश्लेषण : महिला विश्वचषकाची रणधुमाळी सुरू : कोण आहेत संभाव्य विजेते?

– ऋषिकेश बामणे यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याद्वारे शुक्रवारपासून महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला. झळाळत्या कारकीर्दीचा शेवट विश्वचषक विजयाने करण्यासाठी भारताची कर्णधार मिताली राज उत्सुक आहे. मात्र असंख्य आव्हानांना सामोरे गतउपविजेता भारतीय संघ पहिले विश्वविजेतेपद जिंकणार का? विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची बलस्थाने, कच्चे दुवे तसेच विश्वचषकातील अन्य बाबींचा घेतलेला हा सखोल आढावा. विश्वचषकाचे स्वरूप कसे? नियमांत …

Read More »

विश्लेषण : शेन वॉर्न का ठरतो क्रिकेटमधील महानतम फिरकी गोलंदाज?

– सिद्धार्थ खांडेकर ऑस्ट्रेलियाचा विख्यात फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने अवघ्या ५२व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे जगभरचे तमाम क्रिकेटप्रेमी हळहळले आहेत. नव्वदच्या दशकात आणि २०००मधील पहिल्या दशकात वॉर्नच्या जादुई फिरकीने क्रिकेटमधील या नजाकती कौशल्याला संजीवनी मिळाली असे म्हणावे लागेल. सातशेहून अधिक कसोटी बळी आणि त्यांतील अनेक बळींच्या मागे दडलेली नाट्यमयता, तसेच अनेक वादांच्या केंद्रस्थानी राहूनही सर्व प्रकारच्या क्रिकेटवर – कसोटी ते …

Read More »

बारावी परीक्षेत गुणवत्तेचा बट्टय़ाबोळ! ; पालक शाळेचा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पथ्यावर; भरारी पथके पोहचलीच नाहीत

नागपूर : करोनाची खबरदारी म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रत्येक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र देत शुक्रवारपासून परीक्षेला सुरुवात केली. परंतु, विभागातील बहुतांश शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण परीक्षेचा बट्टय़ाबोळ झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी लेखी परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरला विभागात दहा ते पंधरा कॉपीची प्रकरणे असताना यंदा पालक शाळांमध्येच परीक्षा असल्याने भरारी पथकांच्या दुर्लक्षामुळे गडचिरोलीमधील एक प्रकरण वगळता दुसरीकडे कुठेही …

Read More »

काँग्रेसकडून जरीपटका घटनेची चित्रफित सादर ; कुकरेजा यांनी दलित महिलांना मारहाण केल्याचा आरोप

नागपूर : बांधकाम व्यावसायिक व भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा दलित महिलांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ करीत असल्याची चित्रफित आज शुक्रवारी काँग्रेसने पत्रकार परिषदेत सादर केली. सोबतच या चित्रफितीद्वारे नागपूर पोलीस आयुक्तांवर कुकरेजा यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठीचा दबावही वाढवला आहे. पत्रकार परिषदेस अ.भा. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक अनिल नगराळे, नगरसेविका नेहा निकोसे, ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते. बाबू खान …

Read More »

राजकारण ही रेल्वेगाडी, अनेक चढतात-उतरतात! – गडकरी

गेल्या पाच वर्षांत जनतेने काम करण्याची संधी नगरसेवकाच्या माध्यमातून दिली हाच तुमच्यासाठी पुरस्कार असल्याचेही गडकरी म्हणाले. नागपूर : महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  राजकारण हे मुळातच रेल्वे गाडीसारखे आहे. त्यात अनेक चढतात आणि उतरतात. त्यामुळे प्रभागामध्ये ज्याच्यामागे जनता आहे त्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गेल्या पाच वर्षांत जनतेने काम करण्याची …

Read More »

आम आदमी पक्षाचे विकासकामांबाबत महापौरांना १५ प्रश्न ; महापौरांचा सत्कारही केला

नागपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पण शुक्रवारी महापालिकेचा पाच  वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे आम आदमी पक्षाने महापौर दयाशंकर तिवारी यांना शहराच्या विकास कामासंबंधी पंधरा प्रश्न असलेले शुभेच्छा पत्र देत जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी मागणी केली. मात्र महापौरांनी हे शुभेच्छापत्ररूपी निवेदनच स्वीकारले नाही. यावेळी महापौरांचा सत्कारही करण्यात आला.  गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजपची सत्ता आणि केंद्रात …

Read More »

तोकडय़ा कपडय़ांमुळे युवतींना मारहाण ; पुण्यातील धक्कादायक प्रकार; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा

पुणे : माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतींनी तोकडे कपडे परिधान केल्यामुळे शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी  खराडी भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या तीन महिलांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही युवती परराज्यातील आहेत. अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण …

Read More »

ऊस अतिरिक्त ठरण्याची भीती वाढली ; उसाला तुरे आल्याने शेतकरी धास्तावले

औरंगाबाद : राज्यातील १८९ साखर कारखान्यांकडून ९५३ लाख ९४ हजार उसाचे गाळप झाले असले, तरी मराठवाडय़ातील बहुतांश उसाला आता तुरा आला आहे. जालना जिल्ह्यात ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता असून आता ऊस देयकांची रक्कम मिळू लागली असली, तरी मराठवाडा व खानदेशातील ५२ साखर कारखान्यांकडून गाळपातील २९५ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम देणे अद्यापि बाकी आहेत. उसाचे अमाप पीक आणि गाळपक्षमता याचा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आगामी निवडणुकांबाबत संभ्रम

हिंगोली : इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) तूर्ततरी राजकीय आरक्षण लागू होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाविना निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली तर राज्य सरकार निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे. या सर्व घडामोडींमुळे हिंगोली जिल्ह्यातील तीन नगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला …

Read More »

रिद्धपुरात डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाची विटंबना

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले. त्यामुळे रिद्धपुरात तणाव निर्माण झाला होता. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले. या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना कळताच पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. याच दरम्यान काही गावकऱ्यांनी मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर असलेल्या बसस्थानकावर एकत्र येऊन टायर जाळून घटनेचा निषेध केला.  …

Read More »

सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आजचा सोलापूरचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी एकत्र येऊन राज्यपालांना रोखण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. स्वामी विवेकानंद केंद्राच्या जुळे सोलापुरातील नव्या वास्तूचे …

Read More »

वीजप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा भडका

कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा शुक्रवारी भडका उडाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती. विजेच्या विविध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्याच्या एका कोपऱ्यात आंदोलन सुरू असल्याची टीका …

Read More »

विदा अभ्यासाचे महत्त्व करोना काळात अधोरेखित

देशाचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांचे मत पुणे : करोना काळात सर्वसामान्य नागरिकांना विदाचे (डेटा) महत्त्व कळले. रुग्णसंख्या, वाढणारी रुग्णसंख्या, लाटांचे अनुमान या विषयी नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली. विदा अभ्यासाचे महत्त्व करोना काळात अधोरेखित झाल्याचे मत, देशाचे माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांनी शुक्रवारी मांडले. गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेतील लोकसंख्या संशोधन केंद्र, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब …

Read More »

भारत-श्रीलंका कसोटी मालिका : पंतचा झटपट पंथ! ; भारताची ६ बाद ३५७ अशी शानदार मजल; विहारीचे अर्धशतक

मोहाली : विराट कोहलीच्या शतकी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऋषभ पंतच्या फटकेबाजीने छाप पाडली. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत ऋषभने काढलेल्या ९६ धावांच्या बळावर भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दिवशी ६ बाद ३५७ अशी शानदार मजल मारली. कोहलीचा १०० वा कसोटी सामना पाहण्यासाठी पाच हजार क्रिकेटरसिकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला होता. कोहलीने डावाला उत्तम सुरुवात केली. परंतु ४५ धावांवर तो बाद होताच …

Read More »

गव्हातील तेजी फायद्याची; पण खाद्यतेलात कोंडी ; रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

दत्ता जाधव, लोकसत्ता पुणे : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात गहू आणि मक्याचे दर तेजीत आहेत. त्याचा फायदा देशातील शेतकरी आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होणार आहे. मात्र, भारतात युक्रेन आणि रशियातून मोठय़ा प्रमाणावर सूर्यफूल तेल आयात होत असल्यामुळे खाद्यतेलाच्या बाबत कोंडी होणार आहे. आयात घटून सूर्यफूल तेलाच्या दरात वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गव्हाच्या उत्पादनात युक्रेन आणि रशिया हे …

Read More »

अनधिकृत कारखान्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गाला आगीचा धोका

विनापरवाना दुकानांत अग्नीसुरक्षेचे नियमही धाब्यावर, पालिकेकडून कारवाई नाहीच विरार : वसई विरारजवळील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणात भंगारची दुकाने, फ्रिज, एसी तयार करणारे कारखाने आहेत. अग्नीसुरक्षेचे कोणतेही नियम येथे पाळले जात नाहीत. त्यामुळे महामार्गाला आगीचा धोका निर्माण झाला आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई पूर्वेला महामागार्वर अतिक्रमण झाले आहे. त्यात प्रामुख्याने भंगारचे कारखाने आहेत. मागील वर्षभरापासून या परिसरात १०० हून अधिक …

Read More »