Business News : घराघरात त्यांचेच प्रोडक्ट्स; ‘या’ ठरल्या देशातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला, संपत्तीचा आकडा डोकं चक्रावणारा

Business News : भारतीय व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राला गेल्या काही वर्षांमध्ये कमाल झळाळी मिळाली असून, या क्षेत्रात पुरुषांप्रमाणंच महिलासुद्धा त्यांच्या नवनव्या कल्पनांच्या बळावर यशशिखरं गाठताना दिसत आहेत. देशाच्या दृष्टीनंसुद्धा ही अभिमानाची बाब आहे. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर महालासुद्धा पुरुषांप्रमाणंच देशाचं प्रतिनिधीत्व करत नवे विक्रम रचत आहेत. यातच सध्या एक नाव सर्वांच्याच Search History मध्ये दिसत आहे. हे नाव म्हणजे विनोद राय गुप्ता. 

विश्वविख्यात व्यावसाय क्षेत्रातील मासिक फोर्ब्स (Forbes List) सातत्यानं जगातील श्रीमंतांची यादी जाहीर करत असतं. अशीच एक यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये भारतातील 16 अब्जाधिशांचा नव्यानं समावेश झाला आहे. यामध्ये तीन महिलांच्याही नावाचा समावेश असून, त्यांच्या नावांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. (Business news Havells India vinod rai gupta became 4th richest forbes billionaire know her net worth )

Forbes च्या यादीत कोणाला मिळालं स्थान? 

फोर्ब्सच्या माहितीनुसार भारतातील श्रीमंत महिलांमध्ये रोहिका सायरस मिस्त्री, रेखा झुनझुनवाला, लीना तिवारी, विनोद राय गुप्ता आणि सावित्री जिंदल यांच्या नावांचा समावेश आहे. यादीतील आकडेवारीनुसार विनोद राय गुप्ता या देशातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. त्यांचं नाव या यादीत आलंय खरं, पण त्या कोण? काय करतात? हे तुम्हाला ठाऊक आहे का? 

हेही वाचा :  Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

नसेल, तर आताच ठाऊक करून घ्या. विनोद राय गुप्ता या Havells India चे कार्यकारी व्यवस्थापक अनिल राय गुप्ता यांच्या मातोश्री आहेत. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांच्या संपत्तीचा आकडा 3.9 बिलियन युएस डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल 32 हजार कोटी रुपये इतका आहे. 

Havells India विषयी थोडं… 

Havells हे नाव पाहिल्यानंतर आता तुम्हाला अंदाज आलाज असेल की विनोद राय गुप्ता नेमक्या आहेत तरी कोण. त्यांचे पती (दिवंगत) किमत राय गुप्ता यांनी या कंपनीची सुरुवात 1958 मध्ये केली होती. इलेक्र्टीकल्स ट्रेडिंग व्यवसायाच्या रुपात या व्यवसायाची सुरुवात झाली होती. जो पुढे जाऊन पंखा, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन निर्मितीमध्येही नावाजला गेला. 14 कारखाने आणि 50 हून अधिक राष्ट्रांमध्ये सुरु असणारा या कंपनीचा सर्व कारभार सध्या अनिल राय गुप्ता सांभाळतात. त्यामुळं ज्या घरात Havells आहे त्या घरात विनोद राय गुप्ता हे आता नवं नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

काय ती श्रीमंती…..

Forbes च्या यादीत उल्लेख केल्यानुसार भारतामध्ये सध्याच्या घडीला सर्वाधित श्रीमंत महिला म्हणून जिंदल समुहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदल यांच्या नावाची नोंद आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांना 94 वं स्थान आहे. या यादीतील रोहिका मिस्त्री या सायरस मिस्त्री यांच्या पत्नी आहेत. 55 वर्षीय रोहिका यांच्या नावावर 7 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. तर, राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी, रेखा झुनझुनवाला यांचंही नाव या यादीत असून, त्यांची संपत्ती 5.1 अब्ज डॉलर इतकी आहे.  

हेही वाचा :  स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात... कोण आहे गँगस्टर रवी काना?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …