सेंट बँक होम फायनान्समध्ये बंपर भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023:  बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफिसरच्या 31, सिनियर ऑफिसरच्या 27,  सिनियर ऑफिसर (HR) ची 1,सिनियर ऑफिसर (कंप्लायंस) ची 1 जागा भरली जाणार आहे.  यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना कॉम्प्युटर हाताळता यावा. संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव असावा. 

सिनियर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठात  कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. कॉम्प्युटरचे ज्ञान आणि कामाचा 2 वर्षांचा अनुभव असावा. 

सिनियर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी असावी. एचआरमध्ये स्पेशलायझेशनसह दोन वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी असावी.  कॉम्प्युटरचे ज्ञान आणि कामाचा 2 वर्षांचा अनुभव असावा. 

हेही वाचा :  एका व्यक्तीकडे किती Bank Account असावेत? सरकारचा नियम लक्षात ठेवा, नाहीतर...

सिनियर ऑफिसर (कंप्लायंस) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटीव्हचे शिक्षण घेतलेले असावे. तसेच उमेदवाराला संगणकाची माहिती आणि 2 वर्षांचा अनुभव असावा. सेंट बँक होम फायनान्समध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 21 ते 35 वर्षापर्यंत असावे. एससी, एसटी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.  

सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांकडून  500 रुपये अर्ज शुल्क तर मागासवर्गीय उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारण्यात येईल. निवड झालेल्यांना संपूर्ण भारतातील सेंट बँक होम फायनान्सच्या शाखेत नोकरी करता येईल. ऑफिसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 3 लाख 60 लाख रुपये तर सिनियर ऑफिसर पदासाठी वार्षिक 4 लाख रुपये पगार दिला जाणार आहे. 11 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत वेबसाईट www.cbhfl.com वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …