पावडर, लिपस्टिक लावणाऱ्या बॉबकटवाल्या महिलांना आरक्षणाचा फायदा? ‘हा’ राजकीय नेता बरळला

Women Reservation Bill : ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आलं. हे विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी संमत झालं. या विधेयकामुळे संसदेबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के जागांवर आरक्षण मिळालंय, तसंच इतर क्षेत्रातही महिलांचा सहभाग वाढणार आहे. पण महिला आरक्षणाबाबत एका राजकीय नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला लागला आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते अब्दुल बारी सिद्दीकी (Abdul Bari Siddiqui) यांनी महिला आरक्षण विधेयकावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महिला आक्षणात मागास आणि अतिमागावर्गीय कोटाही निश्चित करण्यात यावा. नाहीत आरक्षणाच्या नावावर पावडर, लिपस्टिक लावणाऱ्या आणि बॉबकटवाल्या महिला नोकरीत पुढे जातील. आणि मागासवर्गीय महिला तशाच राहतील, असं वक्तव्य अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केलं आहे. 

बिहारमधल्या मुझफ्फरपुर मध्या ‘जागरुकता सम्मेलना’ला संबोधित करताना महिला आरक्षण हे मागास आणि अति मागासवर्गाच्या आधारावर मिळायला हवं असं अब्दुल बारी सिद्दीकी यांनी म्हटलंय, तसंच लोकसभा निवडणुकीपर्यंत टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहा असं आवाहनही त्यांनी संम्मेलनाला आलेल्या लोकांना केलं. 

हेही वाचा :  सोनं सत्तरी पार जाणार? 10 दिवसात तब्बल 3430 रुपयांनी महागले, आजचा सोन्याचा दर काय?

टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहा, यामुळे आपलं शिक्षण किंवा प्रतिष्ठा वाढणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. इतंकच नाही तर लोकसभा निवडणुकीपर्यंत टिव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याची शपथ घ्या असं आवाहनही अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केलं. आपल्या पूर्वजांचा अपमान आठव आणि अशी प्रतिज्ञा घ्या की आम्ही आमच्या मुलांना शिक्षण देऊ आणि आमच्या हक्कासाठी लढू. लोहिया यांनी दाखविलेल्या मार्गावर आम्ही चालू, असं आवाहनही अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केलं आहे. असा संकल्पच करा अन्यथा या जागरुकता सम्मेलनाला अर्थ रारणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. 

अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद बिहारच्या राजकीय पटलावर उटले आहेत. बॉबकट-लिपस्टिकच्या वक्तव्याचं आरजेडीने समर्थन केलं आहे. तर इतर पक्षांनी या वक्तव्याचा विरोध केला आहे. आमच्या पक्षाचे नेते नितीश कुमार सर्वच महिलांचा सन्मान करतात, मग त्या महिल्या लिपस्टिक लावणाऱ्या असूदे की न लावणाऱ्या असूदे, असं जेडीयूने म्हटलं आहे. तर भाजप नेते जनक सिंह यांनी सिद्दीकी यांना कोर्टात खेचण्याची धमकी दिली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …