SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार

SBI News : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहाकांसाठी मोठी बातमी दिली आहे. त्यामुळे बँकेची कामे ग्राहकांना घरी बसल्या सहज करता येणार आहे. SBI ने YONO अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आता थेट स्कॅन आणि पेमेंट करता येणार आहे. SBI ने 2017 मध्ये YONO अ‍ॅप सुरु केले. त्यानंतर त्याचे ग्राहक वाढतच गेले. बँकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत करोडो लोक SBI चे YONO अ‍ॅप वापरत आहेत. 

SBI ने YONO अ‍ॅपमध्ये केले मोठे बदल  

सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. यातच आता SBI ने  YONO अ‍ॅपमध्ये बदल केले आहेत. अ‍ॅपमध्ये बदल केल्यानंतर, लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत, त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.

6 कोटी लोकांना फायदा 

बँकेने आता YONO च्या UPI मोडमध्ये स्कॅन आणि पे आणि पे टू कॉन्टॅक्ट्स सारख्या अनेक फीचर्सचा समावेश केला आहे. यासह, ग्राहक आता कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपवर न जाता एकाच ठिकाणाहून पैसे पाठवू आणि घेऊ शकतील.

हेही वाचा :  LPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या

SBI ने 2017 मध्ये YONO अ‍ॅप सुरु केले. त्यानंतर त्याचे ग्राहक वाढतच गेले. बँकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत करोडो लोक SBI चे YONO अ‍ॅप वापरत आहेत. आता अ‍ॅपचा पेमेंट मोड बदलल्याने 6 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. बँकेने सांगितले की, गेल्या वर्षी सुमारे 78.60 लाख लोकांनी YONO अ‍ॅपद्वारे डिजिटल बचत खाती उघडली आहेत.

कार्डशिवाय पैसे काढता येणार

बँकेने 68 व्या दिवशी आपल्या ग्राहकांना कार्डशिवाय पैसे काढण्याच्या सुविधे बदल केला आहे. आता SBI ग्राहक ICCW म्हणजेच इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरु केली आहे. या सुविधेनुसार, ग्राहक कोणत्याही एटीएममधून कार्डलेस कॅश काढू शकतात. यासाठी ते बँकेचे UPI QR कॅश फीचर वापरु शकतात. कार्डलेस कॅश वैशिष्ट्यामुळे लोकांचे कार्ड गमावण्याचा किंवा त्याचा गैरवापर होण्याचा धोका कमी होईल.  

तसेच एसबीआयच्या Yono अ‍ॅपच्या मदतीने ग्राहक बँकिंग व्यवहारांव्यतिरिक्त सिनेमाची तिकिटे बुक करु शकतात. शॉपिंग करु शकतात. हॉटेल, भाजी किंवा चहाच्या बिलांसह इतर पेमेंट करु शकतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …