भाभी जी घर पर है तील अंगुरीने का तोडलं 19 वर्षाचं नातं, शाळेतून सुरू झाली शुभांगीची लवस्टोरी

हिंदू धर्मात लग्न म्हणजे सात जन्मांचे पवित्र बंधन मानले जाते. पण अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, हे नाते एक दिवसही टिकवणे कठीण होऊन बसते. ज्यानंतर अनेक वर्षांचा संसार करूनही जोडपी वेगळे होण्याचा निर्णय घेतात. नुकतंच ‘bhabhiji ghar par Hai’ मालिकेमधील ‘anguri Bhabhi’ हे पात्र निभावणाऱ्या shubhangi atre ला देखील अशाच स्थितीचा सामना करावा लागला. अभिनेत्री शुभांगी अत्रे आपला पती पियुष पुरीपासून 19 वर्षांनंतर विभक्त झाली आहे. शुभांगी आणि पियुष शाळेतूनच एकमेकांवर प्रेम करत होते. ते दोघेही एकत्रच शिकत होते. दोघांना 18 वर्षांची एक मुलगीही आहे. मुलगी दोन वर्षांची असताना शुभांगीने आपलं अभिनय करिअर सुरु केलं होतं. जेव्हा शुभांगी शूटवर जायची तेव्हा पती मुलीचा सांभाळ करत असे. या दोघांमध्ये फारच छान बॉन्डिंग होतं. पीयूष मार्केटिंग क्षेत्रात काम करतो. परंतु अचानक या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच चकित झाले आहेत.

शुभांगी अत्रेने आपल्या लग्नाविषयी सांगितले की, ‘आम्ही दोघेही हे नातं जपण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतो, पण तरीही अनेक समस्या येत राहिल्या, त्यानंतर आम्ही सगळं त्रास एकत्र संपवण्याचा निर्णय घेतला. शुभांगीने हे सुद्धा उघड केले की गेल्या एक वर्षापासून ती तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. हे पहिल्यांदाच घडत नसून टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक जोडपी आहेत ज्यांनी लग्नाच्या अनेक वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे सगळं पाहून मनात हा प्रश्न येतो की असे काय कारण असते की 10-15 वर्षे एकत्र राहून नंतर मात्र एकमेकांना कपल्स कंटाळतात? आज आपण या लेखातून जाणून घेऊया की खूप वर्षांचे संसार एका वळणावर आल्यावर का तुटतात? (फोटो सौजन्य :- iStock, शुभांगी अत्रे इंस्टाग्राम, Freepik))

हेही वाचा :  पुण्यातील खराडी परिसरात घोंगावणारं 'ते' वादळ डासांचं नाही! धक्कादायक माहिती आली समोर...

संसारातील सर्वात कठीण काळ कोणता असतो?

संसारातील सर्वात कठीण काळ कोणता असतो?

रिलेशनशिप थेरपिस्ट एमी हार्टस्टीन LCSW यांच्या मते, लग्नाची पहिली 3-5 वर्षे खूप कठीण आणि नाजूक असतात. या काळात अनेक घटस्फोटही घडतात. या वर्षांमध्ये घटस्फोटाचे सर्वात सामान्य कारण बनलेल्या समस्यांमध्ये संवादाच्या समस्या, जबाबदाऱ्यांबाबत मतभेद, सासरच्या लोकांशी मतभेद यांचा समावेश होतो.
(वाचा :- धडधाकट पुरूष असूनही मी बायकोला आवरू शकत नाही याची लाज वाटू लागलीये,पुरूषाचा जन्म घेतला यात चूक आहे का हो माझी?)​

आनंदी संसार नसल्याची लक्षणे

आनंदी संसार नसल्याची लक्षणे

जोडीदाराशी योग्यरित्या संवाद साधण्यास असमर्थता असणे, भावनिक आणि शारीरिक जवळीक नसणे, जोडीदारासोबत वेळ घालवणे टाळणे, एकमेकांमध्ये दोष शोधणे, वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्य जगणे, एकमेकांना न जुमानणे, या सर्व गोष्टी संसार सुखी नसल्याचे संकेत देतात. ज्या कपल्स मध्ये या गोष्टी घडतात असतात त्यांना अधिक काळ आपले नाते धरून ठेवता येत नाही. एक ना एक दिवस त्यांच्या भावनांचा कडेलोट होतो.
(वाचा :- काय आहे रिलेशनशिपचा 3 Month Rule? ब्रेकअपनंतर फॉलो केल्यास नवीन पार्टनर मिळाल्यावर सोन्याहून पिवळं होईल नातं.!)​

हेही वाचा :  Video : "ही बोलण्याची पद्धत नाही"; कॅनडाच्या पंतप्रधानांवर भडकले शी जिनपिंग

संशोधन काय सांगतं?

संशोधन काय सांगतं?

ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात 35 वर्षे वयोगटातील 2000 विवाहित महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. परिणामी, संशोधकांना असे आढळून आले की पहिल्या 10 वर्षांच्या आतच बहुतांश महिलांचा संसार धोक्यात आला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे आपला संसार सुखी रहावा म्हणून प्रत्येक प्रकारे प्रयत्न करून सुद्धा त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर होते. पण या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की अजून काही वर्षे हीच स्थिती राहते. पण एकदा का तो टप्पा पार केला की पुढचा सर्व संसार हा आनंदात जातो.

(वाचा :- पुरूषहो, हे 6 गुण ज्या मुलांमध्ये असतात त्यांना मुली समजतात Husband Material, कधीच सिंगल राहत नाहीत असे पुरूष)​

का तुटतात खूप वर्षांचे संसार?

का तुटतात खूप वर्षांचे संसार?

NCBI च्या अहवालानुसार, घटस्फोटाची सर्वात सामान्यपणे नोंदवलेल्या कारणांमध्ये कमी वयात विवाह होणे, संवादातील समस्या, वचनबद्धतेचा अभाव, फसवणूक, वाद, घरगुती हिंसाचार आणि मद्यपान, प्रेमाचा अभाव, अपत्य नसणे, पैशावरून भांडणे इत्यादींचा समावेश आहे. हीच ती कारणे आहेत जी डोईजड झाल्यावर घटस्फोटापर्यंत पोहोचतात.

(वाचा :- लग्नानंतर काही महिन्यांतच मी नव-याला नको त्या स्थितीत रंगेहात पकडलं, नंतर नव-याने जे केलं ते ऐकून हादरूनच जाल)​

हेही वाचा :  गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कडाडले; महाविकास आघाडीवर सडकून टीका..

संसार कसा वाचवावा?

संसार कसा वाचवावा?

जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अशा प्रकारच्या समस्या दिसत असतील, ज्यामुळे भविष्यात तुमचे नाते तुटू शकते, तर ते वाचवण्यासाठी तुम्ही आतापासूनच उपाय करणे फायदेशीर ठरेल. पण यासाठी तुम्ही निवांतपणे विचार केला पाहिजे की हे नाते तुम्हाला खरंच मनापासून वाचवायचे आहे का आणि या नात्यात खरंच काही उरलं आहे का? जर उत्तर ‘हो’ असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आणखी एक संधी दिली पाहिजे. त्यांना तुमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. यासोबतच तुमच्या लग्नाची तुलना दुसऱ्याच्या लग्नाशी न करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडू शकते. वैवाहिक जीवनातील समस्या नेहमी जोडीदारासोबत मिळून सोडवा.
(वाचा :- लग्नानंतर 6 महिने या 5 गोष्टींसाठी सर्वच लोक कुत्रा-मांजरासारखे भांडतात, जर पार्टनरला वाईट समजत असाल तर सावधान)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही…

Sunita Williams Boeing Starliner Spacecraft : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकल्या आहेत. एका …

पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?

Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर …