ऑस्ट्रेलियाचा दबदबा, पाकिस्तानमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली, 24 वर्षाचा विक्रम कायम

PAK vs AUS: पाकिस्तानविरुद्ध लाहोरच्या (Lahore)  गद्दाफी स्डेडिअमवर (Gaddafi Stadium) खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं 115 धावांनी विजय मिळवलाय. तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये खेळायला गेला होता. दरम्यान, तीन सामनच्या कसोटी मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित ठरला होता.  तर, अखेरच्या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानच्या संघानं मालिका खिश्यात घातली आहे. यापूर्वी 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये खेळायला गेला होता. त्यावेळीही ऑस्ट्रेलियानं 1-0 फरकानं मालिका जिंकली होती.

अखेरच्या कसोटी मालिकेतील पाचव्या दिवशी रोमांचक वळणावर पोहोचला होता. पाचव्या दिवशी चहापानानंतर 351 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव 235 धावांवर आटोपला. कर्णधार बाबर आझम एका टोकावर असला तरी नॅथन लायननं त्याला 55 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवून पाकिस्तानच्या आशांना तडाखा दिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायननं पाच विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक (27 धावा), अजहर अली (17), इमाम उल हक (70 धावा) फवाद आलम (11 धावा) आणि मोहम्मह रिझवानं शून्यावर आपली विकेट्स गमावली. लंच ब्रेकपूर्वी पाकिस्तानचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल, असं वाटत होते. पण फवाद आलम आणि मोहम्मद रिझवानच्या विकेट्सनं पाकिस्तानला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. टी ब्रेकनंतर बाबर आझमही 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही आणि 115 धावांनी सामना जिंकला आहे.

हेही वाचा :  IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वन-डेमध्ये शार्दूल बेन्चवर? उमरानला मिळू शकते संधी

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …