Australian Open 2023 ट्रॉफीवर नोवाक जोकोविचनं कोरलं नाव, नदालच्या रेकॉर्डशीही केली बरोबरी

Novak Won Australian Open 2023 : टेनिस खेळाचा स्टार खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच यानं (Novak djokovic) त्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनच्या (Australia Open 2023) पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये त्यानं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा (Stefanos Tsitsipas) पराभव केला आहे. नोवाकनं स्टिफनोसला 6-3,7-4 आणि 7-6 अशा फरकानं पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे यासोबत त्यानं स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेलच्या ग्रँडस्लॅमच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. नोवाकनं ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यामुळे त्याच्याकडील ग्रँडस्लॅमची संख्या 22 झाली आहे. त्याने नदालच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सोबतच नोवाकचं हे 10 वं ऑस्ट्रेलिया ओपनचं जेतेपद असून नदालनंही 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे.

विम्बल्डनमध्येही केली होती ऐतिहासिक कामगिरी

नोवाक हा मागील काही वर्षात इतकी अप्रतिम कामगिरी करत आहे, की त्याने दिग्गज खेळाडू राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांना तगडी झुंज दिली आहे. विम्बल्डन 2022 या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देऊन विजेतेपद पटकावलं. जोकोविचनं सलग चौथ्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा पराक्रम यावेळी केला होता. विशेष म्हणजे त्या जेतेपदासह त्याच्याकडं 21 ग्रँड स्लॅम झाली होती. ज्यामुळे त्यानं ग्रेट टेनिस प्लेअर असणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला (Roger Federer) मागे टाकलं होतं. ज्यानंतर आता टॉपवर असणाऱ्या राफेलशीही त्याने बरोबरी साधली आहे.

हेही वाचा :  राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी! चौथ्यांदा मेक्सिको ओपनचं विजेतेपद पटकावलं

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …