युक्रेन-रशिया वाढता तणाव, राष्ट्राध्यक्ष पुतिन दाबणार का अणू बॉम्बचं बटण?

मुंबई :  रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. रशिया हा देश लष्कराच्या दृष्टीने मोठा आणि शक्तिशाली देश आहे, ज्यामुळे त्याने  युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. मात्र असे असतानाही युक्रेन देखील’ झुकेगा नहीं’ म्हणत रशियासमोर तेवढ्याच ताकदीने उभे आहे आणि  रशियाला त्यांनी मोठा दणका दिला आहे. रशियाचे अनेक टँक युक्रेनने नष्ट केले आहेत. दरम्यान, बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा सुरु झाली आहे. रशियाने युद्ध थांबवावे आणि सैन्यही मागे घेण्यात यावे, अशी युक्रेनने मागणी केली आहे.

युक्रेने रशियाकडे मागे हटण्याची मागणी केली असली तरी, रशिया मागे हटेल का? तो कोणती भूमिका घेईल असा जगाला प्रश्न पडला आहे. कारण गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक असं विधान केलं आहे, ज्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या गुरुवारी, टेलिव्हिजनवर “विशेष लष्करी ऑपरेशन”  युक्रेनवर पूर्ण प्रमाणात हल्ला) ची घोषणा केली तेव्हा त्यांनी एक भयानक चेतावणी दिली, ही चेतावणी युक्रेनसह संपूर्ण जगाला दिली आहे.

“बाहेरून जो कोणी ढवळाढवळ करण्याचा विचार करेल. जर कोणी तसे केले तर त्याला असे परिणाम भोगावे लागतील आणि याचे परिणाम असे असतील, जे कोणीही इतिहासात कधीच पाहिलेले नसतील.”

हेही वाचा :  "...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!

नोबेल शांतता पारितोषिक विजेते आणि नोबाया गॅझेटा वृत्तपत्राचे मुख्य संपादक दिमित्री मुराटोव्ह यांचा विश्वास आहे की “पुतिनचे हे शब्द अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीसारखे आहे.

पुतीने वक्यव्य करताना नक्की काय म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये अनेक वेळा म्हटले आहे: “जर रशिया नाही, तर आपल्याला या ग्रहाची गरज का आहे? कोणीही लक्ष दिले नाही. परंतु रशियाला पाहिजे तसे वागवले नाही तर सर्व काही उद्ध्वस्त होईल, हा सर्वात मोठा धोका आहे.”

व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्राचा पर्याय निवडला तर त्यांच्या, जवळची व्यक्ती त्यांना तसे करण्यापासून रोखू शकेल का?

नोबेल पारितोषिक विजेते दिमित्री मुराटोव्ह म्हणतात, “रशियन राजकारणी कधीही लोकांची बाजू घेत नाहीत. ते नेहमी सरकारची बाजू घेतात.” व्लादिमीर पुतिनच्या रशियात शासक सर्वशक्तिमान आहे. हा असा देश आहे जिथे पुतिनच्या विरोधात उभे राहणारे फार कमी आहेत. त्यामुळे पुतीन काय करेल, हे सांगता येणं कठीण आहे.

युक्रेनमधील युद्ध हे व्लादिमीर पुतिन यांचे युद्ध आहे. क्रेमलिनच्या नेत्यांनी त्यांची लष्करी उद्दिष्टे साध्य केल्यास, सार्वभौम राष्ट्र म्हणून युक्रेनचे भवितव्य संशयाच्या भोवऱ्यात सापडेल. जर रशियाची मोहीम अयशस्वी ठरली आणि त्यांच्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागली, तर यानंतर क्रेमलिन आणखी धोकादायक पावले उचलेल, अशी भीती आहे.

हेही वाचा :  Pune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …