अंधत्वावर केली मात आणि ठरल्या भारतातील पहिल्या दृष्टिहीन IFS अधिकारी !

UPSC IFS Success Story : जगात अशी कित्येक माणसं आहेत. त्यांचा प्रवास आपल्याला स्वावलंबी आणि नव्याने दिशा दाखवणारा ठरला आहे. त्यापैकी एक बेनो जेफिन. चेन्नईच्या मूळ रहिवासी असलेल्या बेनो जेफिनने (IFS Benno Jeffin) २०१५ मध्ये भारताची पहिली दृष्टिहीन महिला IFS (भारतीय विदेश सेवा) अधिकारी बनून नवा इतिहास घडवला. त्या सध्या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहे.

त्यांचे वडील हे रेल्वेत नोकरी करतात‌ तर आई ही गृहिणी आहे. त्यांनी लिटल फ्लॉवर उच्च माध्यमिक विद्यालयात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर तिने स्टेला मॅरिस कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि लोयोला कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिचे पालक अँटोनी चार्ल्स आणि पद्मजा मेरी यांच्या अतुलनीय पाठिंब्यामुळे जेफिनचे मनोबल लक्षणीयरित्या वाढले आणि तिने कधीही स्वतःला अपंग मानले नाही.बेनो जेफिन यांनी लहानपणापासूनच आयएफएस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. ब्रेलमधील IAS (भारतीय प्रशासकीय सेवा) तयारीच्या पुस्तकांसाठी तिचा शोध सुरू झाला. तिची आई पद्मजा ह्या तिला रोज वर्तमानपत्रापासून घडामोडी वाचून दाखवायच्या. दूरचित्रवाणीवरील इंग्रजी बातम्या ऐकून बेनोने जागतिक घडामोडींवरही स्वतःला अपडेट ठेवले.

हेही वाचा :  CNP Nashik Recruitment 2023 – Opening for 117 Junior Technician, Supervisor Posts | Apply Online

अंशतः अंध व्यक्तींचा देखील IFS साठी विचार केला जात नाही अशी सर्वसाधारण कल्पना असूनही, २०१३-१४ मध्ये बेनोने UPSC (Union Public Service Commission) ची परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी, नियुक्ती एक वर्षाने लांबली. पण तिने परीक्षेत ३४३वा क्रमांक मिळवून ती IFS साठी पात्र ठरली.

बेनोने केवळ परीक्षा यशस्वीपणे पास केली नाही तर तिच्या IFS मुलाखतीत उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय परराष्ट्र मंत्रालयात स्थान मिळवले. हा टप्पा गाठणारी ती पहिली महिला ठरली. तिच्या प्रवासावर विचार करताना, तिच्या अपंगत्वामुळे तिच्या आयुष्यातील हा प्रवास आव्हानात्मक होता. तिच्या जीवनातील ध्येय साध्य करण्याच्या या प्रवासात ती स्थिर आणि खंबीर राहिली आणि ती IFS अधिकारी बनली.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …